मुंबई : महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) जागा वाटपाचा घोळ अवघ्या काही जागांवर आलाय. दिल्लीत बैठकांवर बैठका झाल्या. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ एक दिवस उरला आहे. मात्र राज्यातील मुख्य विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीमधील जागावाटपाचे वेगवेगळे फॉर्म्युला समोर आले आहेत. मात्र त्यावरून मविआमधील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये अद्याप एकमत होताना दिसत नाही आहे.शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अधिकाधिक जागा आपल्या पक्षाला मिळवण्याबाबत रस्सीखेच सुरू आहेत.
काँग्रेस पक्षाने मुंबईतील वडाळा, भायखळा आणि वर्सोवा या तीन जागी आपला दावा सांगितला होता. शिवसेना ठाकरे गटाने जागांमध्ये आदलाबदल करून यातील जागा आपल्याला द्याव्यात असा काँग्रेसचा प्रस्ताव होता . मात्र शिवसेना ठाकरे गटाने या तिन्ही जागांवर आपले उमेदवार दिले आणि या बदल्यात बोरीवली आणि मुलुंडची जागा काँग्रेसने घ्यावी असा प्रस्ताव समोर ठेवला आहे.
शिवसेनेला जागा वाटपात मोठे स्थान न मिळाल्याने काहीशी नाराज
विदर्भात जास्तीत जास्त महत्त्वाच्या सर्व जागा काँग्रेसने घेतल्यानंतर विदर्भात महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला जागा वाटपात फार मोठे स्थान न मिळाल्याने काहीशी नाराज आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपली ताकद असलेल्या मुंबईत सुद्धा अधिकाधिक जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आणि मोजके तास शिल्लक राहिल्याने काही जागांवर अंतिम बोलणी काँग्रेसने ठाकरेंचे नेत्यांमध्ये सुरू असल्याची माहिती आहे.
मुंबईतील 36 पैकी 21 जागी उमेदवार
आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटांनी मुंबईतील 36 पैकी 21 जागी उमेदवार दिले आहेत. तर काँग्रेसने 36 पैकी फक्त दहा जागी उमेदवार दिले आहेत . दोन ठिकाणी राष्ट्रवादीकाँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे उमेदवार तर एका जागी समाजवादी पक्ष जाहीर केले आहे. मुलुंड आणि बोरवली या दोन जागी अजूनही उमेदवार अधिकृतरित्या जाहीर केलेले नाहीत.
महाविकास आघाडीत 20 जागांवरचा तिढा कायम
महाविकास आघाडीत अजून 20 जागांवरचा तिढा कायम आहे. महाविकासमध्ये राष्ट्रवादी(शप)कडून 82 उमेदवार जाहीर केले आहे. शिरपूर,दर्यापूर,मोर्शी,पैठण,कळवण,डहाणूचे उमेदवार बाकी आहे. कल्याण पूर्व,बोरिवली,मुलुंड,मानखुर्द-शिवाजीनगरचे उमेदवार बाकी आहे.मलबार हिल,पनवेल,पेण,अलिबाग,श्रीवर्धनचे उमेदवार बाकी आहे. खेड-आळंदी,मावळ,कोथरुड,औसा,उमरग्याचे उमेदवार बाकी आहे. माढा,सातारा,मिरजेच्या मविआच्या उमेदवारांचीही प्रतीक्षाच आहे.
हे ही वाचा :