Beed: राज्यात विधानसभा निवडणुकांचं (Maharashtra Vidhansabha Election 2024) बिगुल वाजलं असून राज्यात निवडणुकीचा रणसंग्राम पहायला मिळत आहे.  निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आता भाजपची उमेदवारांची यादी आली आहे. यात बीड जिल्ह्याचा फॉर्म्युला समोर आला आहे. दरम्यान, बीड मधून भाजपा आणि पंकजा मुंडे यांना ऊसतोड कामगार संघटनांनी थेट आव्हान दिले आहे. ऊसतोड कामगारांच्या 9 संघटनांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केलीय. याच अनुषंगाने बीडमध्ये संघटनांनी बैठक बोलावली होती. या बैठकीतून राज्यातील सहा जागेवर दावा करत लढणार असल्याचे सांगितले आहे. 


राज्यातील 9 ऊसतोड कामगार संघटनेची बैठक पार पडली असून राज्यातील पाच जागा लढविणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


सत्तेतील वाट्यासाठी ऊसतोड कामगारांचे बंड


राज्यामध्ये 22 लाख ऊसतोड कामगार आहेत. त्यातील एकट्या बीड जिल्ह्यात चार लाख 85 हजार मजूर आहे. त्यांचे नेतृत्व आजपर्यंत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून होत होतं. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी या ऊसतोड कामगारांचा नेतृत्व केलं. परंतु आता सत्तेत वाटा मिळावा म्हणून ऊसतोड कामगार संघटनांनी बंड पुकारात राज्यातील पाच जागेवर दावा केला आहे.


कोणत्या 5 जागांवर उमेदवार उभे राहणार?


बीड, आष्टी, चाळीसगाव, कन्नड आणि माजलगाव या विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले जाणार आहे. याबाबत महायुती आणि महाविकास आघाडीकडे बोलणी झाली असून यांच्याकडून उमेदवारी न मिळाल्यास या मतदारसंघात अपक्ष लढण्याची तयारी ऊसतोड कामगार संघटनांनी केलीय. यात 9 ऊसतोड कामगार संघटनांचा समावेश आहे.. 


बीडमधील महा विकास आघाडीचे उमेदवार कोण? 



  • बीड विधानसभा मतदारसंघ : संदीप क्षीरसागर 

  • केज विधानसभा मतदारसंघ : अंजली घाडगे

  • परळी विधानसभा मतदारसंघ : राजेभाऊ फड

  • आष्टी विधानसभा मतदारसंघ : मेहबूब शेख

  • माजलगाव विधानसभा मतदारसंघ : रमेश आडसकर


बीड जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार


बीड जिल्ह्यात महायुतीकडून दोन जागेवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील आणि चार जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार असतील. बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघ आणि केज विधानसभा मतदारसंघ मधून भाजपचे उमेदवार महायुतीकडून निवडणूक लढवतील. तर, अजित पवार गटाकडून बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार उमेदवार असतील माजलगाव विधानसभा मतदारसंघ गेवराई विधानसभा मतदारसंघ परळी विधानसभा मतदारसंघ आणि बीड विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार पाहायला मिळतील.


हेही वाचा:


Beed Vidhan Sabha Election 2024 : बीडमध्ये विधानसभेचं रणकंदन; महाविकास आघाडी आणि महायुतीचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या मतदारसंघात कुणाला तिकीट?