Madha Vidhansabha Election Shivaji Sawant : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. प्रत्येक मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय. अशातच माढा विधानसभा (Madha Vidhansabha) मतदारसंघातही मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सांवत (Shivaji Sawant) यांनी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे (MLA Babandada Shinde) यांचे पुत्र रणजित शिंदे (Ranjit Shinde) यांना पाठिंबा दिला आहे. रणजित शिंदे हे माढा विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
सावंत-शिंदे यांचं माढ्यात नवीन राजकीय समीकरणं
शिवाजीराव सावंत यांनी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना पाठिंबा दिल्यानं माढा विधानसभेत नवीन ट्वीस्ट निर्माण झाला आहे. माढा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मिनल साठे यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, अशातच सावंत गटाकडून मात्र अपक्ष रणजित शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवाजीराव सावंत यांनी रणजित शिंदे यांना पाठिंबा दिल्यानं माढा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिवाजीराव सावंत यांच्या पाठिंब्यामुळं रणजित शिंदे यांची ताकद वाढली आहे. दरम्यान, शिवाजीराव सावंत हे शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांना पाठिंबा देतील अशी मतदारसंघात चर्चा होती. मात्र, सावंत यांनी रणजित शिंदेंना पाठिंबा दिल्यानं माढ्यात नवीन राजकीय समीकरणं तयार झालं आहे.
शिवाजीराव सावंत हे 30 वर्षापासून राजकारण आणि समाजकाराणात सक्रिय
शिवाजीराव सावंत यांच्या कार्यकर्त्यांचा मोटा गट माढा तालुक्यात सक्रिय आहे. ते आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. माढा तालुक्यात गेल्या 30 वर्षापासून शिवाजीराव सावंत हे राजकारण आणि समाजकारणात सक्रीय आहेत. कारखानादारीच्या आणि शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी मोठं जाळ निर्माण केलं आहे. ते सध्या शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम करत आहेत. ते यावेळी माढा विधानभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी दिली नाही. काँग्रेसच्या माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली. त्यामुळं शिवाजी सावंत हे नाराज आहेत. त्यामुळं शिवाजी सावंत नेमका कोणता निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर शिवाजी सावंत यांनी रणजित शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
महत्वाच्या बातम्या: