राज्याच्या चाव्या शरद पवारांच्या हाती, मुख्यमंत्री ठरवायला आम्हाला दिल्लीवारी करावी लागणार नाही, जितेंद्र आव्हाड 

Jitendra Awhad : राज्याच्या चाव्या या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हाती असतील, असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे.

Continues below advertisement

Jitendra Awhad : राज्याच्या चाव्या या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हाती असतील, असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) 160 पेक्षा जास्त जागा निवडून येणार आहेत. त्यामुळं अपक्ष आमच्याचकडेच येणार असल्याचे आव्हाड म्हणाले. आम्हाला मुख्यमंत्री (Chief Minister) ठरवायला दिल्लीवारी करायला लागणार नाही, सिल्वरओक आमच्यासाठी आणि  शिवसेनेसाठी मातोश्री आहे. तर काँग्रेस मोठा पक्ष आहे त्यांचे नेते बघतील असंही आव्हाड म्हणाले. 

Continues below advertisement

राज्यात ज्यांची सत्ता येईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले की, आंबेडकरांचं आमच्याकडे स्वागतच आहे. कारण, आमच्या 160 जागा येणार असल्याचे आव्हाड म्हणाले. निवडणूक यंत्रनेने याद्या व्यवस्थित केल्या तर मतदानाचा टक्का आणखीन वाढेल असे आव्हाड म्हणाले. EVM मशीनवर माझा दोन पैशांचा विश्वास नसल्याचे आव्हाड म्हणाले. महायुतीकडे पैशांचे पेटारे आहेत, म्हणून त्यांना अपक्षांना संपर्क करत असल्याचे आव्हाड म्हणाले. आमच्यासारख्या सर्वांना वाटतं की EVM मध्ये घोटाळा होतोच, बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत असे आव्हाड म्हणाले. 

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

राज्यातील विधानसभा त्रिशंकू राहणार असल्याचा अंदाज  प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. राज्यातील सध्याचे राजकारण तत्वहीन असून सध्याच्या परिस्थितीत कोणीही कुठेही जाऊ शकतं. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सत्तेसोबत जाणं महत्त्वाचं वाटतं. या वक्तव्यातून प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. तर 'बटेंगे तो कटेंगे"च्या मुद्द्यावरही आंबेडकरांनी भाजपवर प्रहार केला आहे. विकासाचे मुद्देच नसल्यामुळे भाजप मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी बुधुवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता उद्या विधानसभेचे निकाल जाहीर होणार आहेत. या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. राज्यात कोणाची सत्ता येणार याचं चित्र उद्या स्पश्ट होणार आहे. दरम्यान, महायुतीच्या नेत्यांनी आम्हीच पुन्हा सत्तेत येऊ असा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील आम्ही बहुमताचा आकडा गाठू असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळं नेमकं कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाचं लागली आहे. दरम्यान, उद्या दुपारपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या:

... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola