Sada Sarvankar Narendra Modi मुंबई: माहीम विधानसभा मतदारसंघात (Mahim Vidhan Sabha) तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये मनसेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray), शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु आहे. 


महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे मुंबईतील सर्व उमेदवार मंचावर उपस्थित होते. माहीम विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) देखील मंचावर होते. नरेंद्र मोदी महायुतीच्या या सर्व उमेदवारांची भेट घेत होते. यावेळी सदा सरवणकरांची देखील नरेंद्र मोदींनी भेट घेतली. नरेंद्र मोदी समोर येताच सदा सरवणकरांनी त्यांना नमस्कार करत पाया पडले. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 


संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुतीसोबत- नरेंद्र मोदी


महाराष्ट्रातील निवडणुकीतील आजची माझी शेवटची सभा आहे. मी संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे. आज मी आमच्या मुंबईत आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे.  आज एकच आवाज आहे, भाजप महायुती आहे तर गती आहे, तरच महाराष्ट्राची प्रगती आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. महायुती स्वप्नांना पूर्ण करणारे बंधन आहे. मध्यमवर्ग ज्याने दशकांपासून स्वप्न नाही बघितले त्याचे स्वप्न पूर्ण होत आहेत.  आम्ही स्टार्टअप इंडिया सुरु केला, मुंबईत मोठ्या प्रमाणात स्टार्टअप येतायत. 70 लाख रेडीपटरीवाल्यांना आपला व्यापार वाढायला मदत मिळाली आहे. मुंबईत आमच्या 1 लाख पेक्षा अधिक रेडीपटरीवाल्यांना रोजगार मिळाला असल्याची माहिती नरेंद्र मोदींनी दिली. 


मुंबई बाळासाहेबांच्या सिद्धांताचे स्वाभिमानाचे शहर-


मुंबई अनेक भाषांची लोकं येतात. मात्र मविआ भांडणं लावते. काँग्रेस सरकार बनवण्यासाठी उत्सुक आहे.  त्यामुळे ते एससी, एसटी, ओबीसी यांच्यात भांडणं लावत आहेत.  आरक्षण देखील ही लोकं तुमचं घेऊन टाकतील. त्यामुळे एक है तो सेफ है, असं नरेंद्र मोदी म्हणाले. मुंबई बाळासाहेबांच्या सिद्धांताचे स्वाभिमानाचे शहर आहे. मात्र एक पक्ष मविआत आहे, ज्याने काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला आहे. काँग्रेसच्या शहजादाकडून बाळासाहेबांचे गौरवउद्गार काढायला सांगा...हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणायला लावा, असं आव्हान नरेंद्र मोदींनी दिले. सावरकरांना शिव्या देणाऱ्यांच्या गळ्यात गळे टाकत फिरत आहेत. काँग्रेसचं सरकार असताना देशात दहशतवादी घटना होत होत्या. मात्र आता ते बंद झालंय. आज देशात मोदीचं सरकार आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.


नरेंद्र मोदींच्या सभेचा संपूर्ण, Video:



संबंधित बातमी:


Eknath Shinde: तुम्ही उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंना आपले प्रतिस्पर्धी मानता का?; एकनाथ शिंदे म्हणाले...