पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल आंबेगावला देवदत्त निकम (Devdatta Nikam) यांच्या प्रचारार्थ सभेला संबोधित केलं. या सभेत शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर थेट गद्दारीचा शिक्का मारला. शरद पवार यांच्या सभेतील आरोपांना उत्तर देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी रद्द केली. त्यानंतर त्यांनी 18 नोव्हेंबरच्या सांगता सभेचा मुहूर्त निवडला आहे. मात्र, दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील (Purva Walse Patil) मात्र आपलं मौन सोडलंय. 


पूर्वा वळसे पाटील काय म्हणाल्या?


हक्काचं पाणी, आमच्या मतदारसंघाचं पाणी, आमच्या तालुक्याचं पाणी, सात लाख जनतेचं पाणी, सात लाख शेतकऱ्यांचं पाणी जे पळवून नेतात त्यांच्याशी आपल्या साहेबांनी गद्दारी केली, सात लाख लोकांचा लढा आपले साहेब लढत आहेत त्याचं काय? या गोष्टीचं खंडण झालं का त्या सभेत,आले का समोर व्हिडीओ, हा बोगदा होणार म्हणजे होणारच, सहा महिने पाणी आलं नाही तर काय होईल, , असा सवाल पूर्वा वळसे पाटील यांनी केला.   एक खराब उन्हाळा आला, एक दिवस पाणी आलं नाही तर जिवाची तळमळ होते, सहा महिने पाणी आलं नाही तर आपण रस्त्यावर येऊ, आपल्या तोंडातील घास काढून दुसऱ्यांच्या तालुक्यात हे लोक दिवाळी करायला निघालेत, काही तर लाज वाटली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.  


दातृत्त्व भाव आपल्यात नाहीये का,  2018 मध्ये साहेबांनी म्हटलं होतं जे अतिरिक्त पाणी आहे धरणातील ते बोगद्यानं हमखास न्या, 11 मीटरच्या पातळीवर बोगदा करा आणि हमखास न्या पण त्यांना तळामध्ये 1 मीटर पातळीवर बोगदा करुन पाणी त्यांच्या तालुक्यात न्यायचंय, समोरच्या पक्षातील ज्येष्ठ असतील किंवा इतर कोणी असतील कोणी याचं खंडण करत नाहीत म्हणजे आपली किती जमेची बाजू आहे समजून घ्या, असंही पूर्वा वळसे पाटील यांनी म्हटलं.  


पूर्वा वळसे पाटील यांनी पुढं म्हटलं, दीड वर्ष आपण सगळ्यांची बोलणी ऐकून घेतली,  वार सहन केले, गद्दार गद्दार, निष्ठाहीन, यांचा घोटाळा असेल म्हणून लोकं गेले हे सगळं ऐकून घेतले, एक आरोप आणून दाखवा साहेबांच्या विरोधात, इतरांचे आले तसं साहेबांचं का आलं नाही, आता आपल्या पाण्यावर डोळा आहे. इतका कष्टातून उभारलेला दुष्काळी तालुका असा बनवला आहे, आता या तालुक्याचं पाणी चोरायला निघाला असेल आणि म्हणताय गद्दारी केली, आम्ही आमच्या जनतेशी गद्दारी केली नाही पाणी वाचवून, पाणी चोरांशी गद्दारी केली तर त्याच्यात शरमेची बाब काय आहे. आता तरी सर्वांनी गांभीर्यानं हा विषय समजला पाहिजे., असंही पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या. 


दिलीप वळसेंनी जनतेचं पाणी वाचवून गद्दारी केली असेल तर लाज वाटण्यासारखं काहीचं नाही. काल दूध का दूध, पाणी का पाणी झालं, एका अर्थानं देवाचे आभार मानते, काल घडलं ते खूप चांगलं झालं, असं पूर्वा वळसे पाटील यांनी म्हटलं. 


आपली बाजू किती जमेची आहे,आपलं नाणं किती खरं आहे काल सगळ्यांना कळालं, कारण जर एवढे ज्येष्ठ नेते सुद्धा वळसे पाटील  बोगद्याचं राजकारण करतात हे बोलू शकले नाहीत तुम्ही विचार करा आपली बाजू किती जमेची आहे, असंही त्यांनी म्हटलं. 



इतर बातम्या : 


शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं?