SS Patel Co-operation credit society : 95 वर्षाची यशस्वी परंपरा असलेल्या आणि शतक महोत्सवी वर्षाकडे यशस्वी वाटचाल करत असलेल्या एसबीआय एम्प्लॉईज एम एस पटेल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. भारतातील दोन नंबरची सर्वात मोठी स्टाफ सोसायटी असलेल्या व महाराष्ट्र, गोवा, गुजरात ,मध्य प्रदेश, दिव दमन आणि छत्तीसगड राज्यात कार्यक्षेत्र असणाऱ्या या सोसायटीच्या निवडणुकीत शिवप्रसाद भामरे पॅनलने एक हाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत भारतातील पहिले सर्वात तरुण जनरल सेक्रेटरीचा मान मिळविलेल्या श्री शिवप्रसाद भामरे पॅनल ने एक हाती सत्ता मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. 


त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित कर्मचारी सेना यांचा संघर्ष पॅनल आणि संकल्प पॅनलचा  पराभव करत सर्वच्या सर्व 21 जागा जिंकल्या. निकालानंतर श्री शिवप्रसाद भामरे , श्री हारून सय्यद यांच्यासह उपस्थित सर्व संचालक तसेच युनियनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी श्री हारून सय्यद यांनी निवडणुकीत सहकार्य केलेल्या एसबीआय स्टाफ युनियन, एसबीआय ऑफिसर असोसिएशन, एसबीआय एससी एसटी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन, एसबीआय ओबीसी एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशन चे आभार मानले. श्री शिवप्रसाद भामरे यांनी मिळवलेल्या दैदीप्यमान विजयाबद्दल सर्व मतदार सहकारी सभासद यांचे आभार मानले. तसेच येणाऱ्या काळात ही संस्था सभासदांसाठी सभासदांच्या हितासाठी सदैव झटत राहिल आणि चांगल्या सेवा सुविधा देण्यास कटिबद्ध असेल असा मानस व्यक्त केला.