Ajit Pawar NCP Candidate List Indapur Vidhansabha election  : महायुतीतील भाजपने (BJP) 99 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काल शिवसेना शिंदे गटानं (Shivsena Shinde Group) देखील 45 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP Candidate List Ajit Pawar Rashtrawadi Congres) आपल्या 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये राज्यात चर्चेत असणाऱ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाने विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांना संधी दिली आहे. त्यामुळं इंदापूरमध्ये तिसऱ्यांदा हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) विरुद्ध दत्तामामा भरणे असा समान रंगणार आहे. 

पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आज आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे.  यामध्ये धनंजय मुंडे यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना आंबेगावमधून आशुतोष काळे यांना कोपरगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अजित पवार हे बारामतीमधून, छगन भुजबळ हे येवलामधून, हसन मुश्रीफ हे कागलमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जवळपास निश्चित

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मोठं इनकमिंग सुरु आहे. अशातच काही दिवसापूर्वी भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात (NCP Sharad Pawar) जाहीर प्रवेश केला होता. हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे. तर तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट मिळाल्याचे दिसून येत आहे. कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayan Patil) यांनी  इंदापूरचं शिवधनुष्य हर्षवर्धन पाटील यांनी हाती घ्यावं, असं वक्तव्य केलं होतं. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीबाबत सुतोवाच केले आहे. त्यामुळे एकप्रकारे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळं या मतदारसंघात पुन्हा हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तामामा भरणे असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) 38 उमेदवारांची यादी

बारामती- अजित पवारयेवला- छगन भुजबळआंबेगाव- दिलीप वळसे पाटीलकागल- हसन मुश्रीफ परळी- धनंजय मुंडे दिंडोरी- नरहरी झिरवाळअहेरी- धर्मरावर बाबा अत्रामश्रीवर्धन-  आदिती तटकरेअंमळनेर- अनिल भाईदास पाटील उदगीर- संजय बनसोडे अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोलेमाजलगाव- प्रकाश दादा सोळंकेवाई- मकरंद पाटीलसिन्नर- माणिकराव कोकाटेखेड आळंदी - दिलीप मोहिते पाटीलअहमदनगर शहर- संग्राम जगताप इंदापूर- दत्तात्रय भरणेअहमदपूर- बाबासाहेब पाटील शहापूर- दौलत दरोडा पिंपरी- अण्णा बनसोडे कळवण- नितीन पवारकोपरगाव- आशुतोष काळेअकोले - किरण लहामटेवसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरेचिपळूण- शेखर निकममावळ- सुनील शेळकेजुन्नर- अतुल बेनकेमोहोळ- यशवंत माने हडपसर- चेतन तुपे देवळाली- सरोज आहिरेचंदगड - राजेश पाटीलइगतुरी- हिरामण खोसकरतुमसर- राजे कारमोरेपुसद -इंद्रनील नाईकअमरावती शहर- सुलभा खोडकेनवापूर- भरत गावित पाथरी- निर्णला विटेकरमुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

महत्वाच्या बातम्या:

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कोणाकोणाला तिकीट मिळालं?