Nana Patole : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला कोणीही हात लावू शकत नाही. तो हात आम्ही लावू देणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं. आज आम्ही दिक्षाभुमीवर गेलो होतो. समतेची लढाई दिक्षाभुमीवरुन सुरु केल्याचे नाना पटोले म्हणाले.  राहूल गांधी जे संविधान दाखवतात त्या लाल रंगावरुन फडणवीस यांनी नक्षलवादी म्हटलं आहे. मात्र, आमच्या हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो असे नाना पटोले म्हणाले. लोकसभेपेक्षा जास्त आशिर्वाद जनता आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत देणार असल्याचे पटोले म्हणाले. महाविकास आघाडीचं बहुमताचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला. 


आज मुंबईत महाविकास आघाडीची जाहीर सभा होत आहे. या सभेत पटोले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीच्या 5 गॅरंटी जाहीर केल्या आहेत. यामध्ये महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास दिला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच जातनिहाय जनगणना करणार असून 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील राहणार तसेच  25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे  त्याचबरोबर बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत करणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे.


या सरकारनं महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवण्याचं काम केलं


20 तारखेला निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीनं आज आपले सगळे नेते मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारनं महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवण्याचं काम केलं आहे. सगळ्या नोकऱ्या या सरकारनं बंद केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्राला एटीएम बनवून ठेवल्याचे नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्राला लुटून मुठभर लोकांना गर्भश्रीमंत करण्याचं काम ते करत असल्याचा निशाणा पटोले यांनी लगावला. यावेळी नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा