नांदेड : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभेतून बोलताना 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा दिला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) 'एक है तो सेफ है', असे वक्तव्य केले होते. तसेच व्होट जिहादचा आरोप देखील भाजपकडून करण्यात आला. यावर अल्पसंख्यांक समाजाला लक्ष्य करुन हे नारे दिल्याचा आरोप मविआच्या नेत्यांकडून करण्यात आला. यानंतर कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर भाष्य केले आहे.
नांदेड येथे विशाल हिंदू महागर्जना महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यात कालीचरण महाराज यांचे शिव पठण आणि प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी बटेंगे तो कटेंगे या घोषणावर कालीचरण महाराज यांनी प्रतिक्रिया दिली. हिंदू लोकांचे मत विभाजन होईल तर ते कापले जातील याला इतिहास साक्षी आहे. पाकिस्तान, बांगलादेशमध्ये हिंदू कापला गेलेला आहे. हिंदूंना जर सुरक्षित राहायचं असेल तर हिंदूंनी हिंदूंनाच मतदान करावे. तसेच हिंदूंनी जातीयवादही सोडून द्यायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
जो हिंदू हिताबद्दल बोलेल, त्यालाच मतदान करा
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं मविआला आपला पाठींबा (MVA) आपला पाठिंबा जाहीर केला. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी नोमानी यांनी मविआसह वंचित, एमआयएम, सपा, बविआ आणि अपक्ष उमेदवारांनादेखील पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, आता त्यांचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला. त्यात केवळ महाराष्ट्रच नाही, तर महाराष्ट्रात सरकार गेल्यानंतर दिल्लीतील सरकारही पडणार असल्याचं नोमानी यांनी म्हटलं आहे. यावरून महायुतीच्या नेत्यांनी व्होट जिहादचा आरोप केला आहे. याबाबत कालीचरण महाराज यांनी जो हिंदू हिताबद्दल बोलेल, त्यालाच मतदान करा, असा अध्यादेश धर्मगुरूंनी काढायला पाहिजे, असे म्हटले. विशेषतः महाराष्ट्रात शिंदेंचं सरकारच बसवा, असा मी धर्मादेशच देतो, असेही कालीचरण महाराज यांनी सांगितले आहे.