चंद्रपूर : चांदा ते बांदा असं ज्या राज्याचं वर्णन केलं जातं त्या महाराष्ट्रातील चांदा म्हणजे चंद्रपूर (Chanrapur) जिल्हा... आपल्या राज्यातील चंद्रपूर जिल्हा म्हणजे खऱ्या अर्थाने राज्याचं ऊर्जा केंद्र... कारण याच जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक वीज उत्पादन केल्या जाते. राज्यातील सर्वाधिक कोळसा याच जिल्ह्यातून उत्पादित होतो. पाच मोठे सिमेंट कारखाने आणि राज्यातील पहिला कागद कारखाना अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. यासोबतच आपल्या राज्यातील सर्वाधिक वाघ असलेला जिल्हा म्हणून देखील चंद्रपूरची ओळख आहे. एकीकडे राज्यातील सर्वाधिक जंगल असलेला जिल्हा आणि दुसरीकडे राज्यातील नव्हे तर देशातील सर्वाधिक तापमान असलेला आणि प्रदूषण प्रदूषित जिल्हा अशी परस्पर विरोधी ओळख असलेला जिल्हा म्हणजे चंद्रपूर... याच चंद्रपूर जिल्ह्याचे राजकारण आगामी विधानसभा निवडणुकीच्यामुळे चांगलच तापलंय.
चंद्रपूर मतदारसंघातून किशोर जोरगेवार यांना उमेदवारी मिळाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा जागांवर भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणारा चंद्रपूर राज्यातला एकमेव जिल्हा आहे. तर काँग्रेसकडून प्रविण पडवेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रविण पडवेकर यांनी चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती.
किशोर जोरगेवार आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होणार
किशोर जोरगेवार यांनी 75 हजार मतांनी विजय प्राप्त केला. सुरुवातीला किशोर जोरगेवार भाजपात होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितले. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढविली. तेव्हा दुसऱ्या क्रमांकाची 51 हजार मते त्यांना मिळाली होती. आताच्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र, काँग्रेसनेही त्यांना नाकारले. त्यामुळे अपक्ष म्हणून ते रिंगणात होते. चंद्रपूर मतदारसंघात 2019 साली भाजप विरुद्ध काँग्रेस आणि अपक्ष किशोर जोरगेवार अशी लढत झाली होती. मात्र या लढतीत किशोर जोरगेवार यांनी 1 लाख 17 हजार मतं घेत भाजपचा पराभव केला तर दुसरीकडे काँग्रेसचं डिपॉझिट देखील जप्त झालं होतं. यावेळी किशोर जोरगेवार आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होणार आहे.
कोण आहेत किशोर जोरगेवार?
चंद्रपूर हा विधानसभा मतदारसंघ अनूसुचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. किशोर जोरगेवार यानी 2019 मध्ये भाजप उमेदवाराचा पराभव करत विजयी झाले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला होता. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन होत असताना किशोर जोरगेवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. 2019 ला किशोर जोरगेवार यांनी भाजप उमेदवाराला पराभूत केलं होतं.
हे ही वाचा: