Ashok Chavan: विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघात तळ ठोकून आहेत. श्रीजया चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघ पिंजून काढलाय. कुठलाही सामना हा कमजोर समजत नाही,ते निवडणुक युद्ध म्हणूनच घ्यायला पाहिजे. निवडणुक युद्धाप्रमाणेच लढली पाहिजे अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना घेतलीय. 'माझ्यावर सध्या चहुबाजूने हल्ला होत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री येतायेत. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते येत आहेत. सर्व आमदार हे तळ ठोकून आहेत. हे सर्व कशाकरता? सर्वांनी भोकरच का धरले? असा सवालही अशोक चव्हाण यांनी विरोधकांना केलाय.
लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये गेलेले आणि नंतर खासदारकी मिळलेले नेते अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यातील राजकारणात विधानसभेला आता केवळ ७ दिवस शिल्लक असताना चांगलेच सक्रीय झालेले दिसत आहेत. एकीकडे नांदेड पोटनिवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे लक्ष्य त्यांच्यापुढे आहे. तर दुसरीकडे श्रीजया चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी भोकर मतदारसंघ पिंजून काढलाय.
काँग्रेसमध्ये खूप सोसावं लागलं
माझ्या मागे चारी बाजूने हल्ले होत आहे सर्व नेते भोकरमध्ये तळ ठोकून आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री येतायेत. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते येत आहेत. सर्व आमदार हे तळ ठोकून आहेत हे सर्व कशाकरता सर्वांनी भोकरच का धरले? असा सवाल करत काँग्रेसमध्ये 14 वर्ष खूप सोसावं लागल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. ते म्हणाले, माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले गेले. मला कोर्ट कचेऱ्या करायला लावल्या. तरीही हे सगळं मी सहन केलं आहे. असं चव्हाण म्हणाले.
बाळासाहेब थोरातांचे आरोप फेटाळले
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आरोपावर अशोक चव्हाण यांना विचारले असता, 'मला संपायचा प्रश्न नाही. मी जे काही केलेले आहे ते योग्यच केलेले आहे. काँग्रेसमध्ये मी खूप काही सोसलेले आहे. माझ्यावर बिन बुडाचे आरोप झालेले आहेत. कोर्ट कचेरी माझ्या मागे लागली. मी ते सर्व सहन केल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितले. अशोक चव्हाणांनी त्यांचं राजकारण स्वत:च्या हाताने संपवल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले होते.
जो शिमगा सुरू आहे त्याला मतदार पसंती देणार नाही- अशोक चव्हाण
महाराष्ट्रात गुंतवणूक वाढेल तर त्याला विरोध कशाला कुणाचा हवा. लोकांसोबत चर्चा केली की विरोध मावळतो. उद्धव साहेबांनी पॉलिटिकल स्टेटमेंट यावरून करू नये. तसेच मी राज्यसभेवर आहे, मग लोकसभेत कशाला जाऊ, माझी मुलगी लढते आहे, मी ही लढावे, मला संयुक्तिक वाटत नाही, असेही अशोक चव्हाण म्हणाले. तर संजय राऊत साहेब आपण एक पक्षाचे प्रवक्ते आहोत, वयक्तिक पातळीवर न जाता आरोप प्रत्यारोप करावे. जो शिमगा सुरू आहे मतदार याला पसंती देणार नाही. असेही अशोक चव्हाण म्हणाले.