मुंबई : प्रसिद्ध ज्योतिषी रुद्र करण प्रताप (Rudra Karan Partaap) यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत (POK) मोठं भविष्य वर्तवलं आहे. येत्या २०२५ सालापर्यंत पाकव्याप्त काश्मीरचा भारतात समावेश होण्याची शक्यता आहे, असं भाकित त्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी (Narendra Modi) हेच सत्तेत कायम राहतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.


पाकव्याप्त काश्मीर भारतात कधी येणार, नेमकं सांगितलं 


रुद्र प्रताप हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. एक्स या समाजमाध्यमावर त्यांना ५० हजारपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. पाकव्याप्त काश्मीरबद्दल त्यांनी मोठं भाकित वर्तवलं आहे. एप्रिल २०२५ आणि सप्टेंबर २०२५ या काळात पाकव्याप्त काश्मीरचा भारतात समावेश होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे रुद्र प्रताप पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या समर्थनार्थ ट्वीट करतात. तर दुसरीकडे विरोधकांवर टीका करताना दिसतात. भाजपचे अनेक बडे नेते त्यांना एक्सवर फॉलो करतात. यामध्ये भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, अशी शक्यताही प्रताप यांनी व्यक्त केली आहे.






प्रताप यांनी नेमकं काय भविष्यवाणी केली? 


रुद्र प्रताप यांनी नरेंद्र मोदी यांची मंगळ महादशा चालू आहे, असं सांगितलं. 'मोदी यांची मंगळ महादशा चालू आहे. त्यामुळे अशा स्थितीत जमिनीशी संबंधित प्रकरणांवर लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे. एप्रिल 2025 ते सप्टेंबर 2025 या काळात पाकव्याप्त काश्मीरचा भारतात समावेश होण्याची शक्यता आहे. यासह 2024 सालच्या निवडणुकीत मोदी हेच विजयी होतील. पंतप्रधानपदाचा आणखी एक कार्यकाळ ते पूर्ण करतील,' असं प्रताप यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल केली होती भविष्यवाणी


रुद्र यांनी मार्च 2022 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत भविष्यवाणी केली होती. त्यांची उतरती कळा चालू होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. मार्च 2024 पासून त्यांचा वाईट काळ चालू होईल, असं ते म्हणाले होते. सध्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाअंतर्गत केजरीवाल यांच्यावर ईडीने कारवाई केलेली आहे. सध्या ते तरुगांत आहेत. 21 मार्च 2024 रोजी ईडीने ही कारवाई केली होती. याच कारणामुळे रुद्र यांनी केलेलील भविष्यवाणी खरी ठरली, अशी भावना लोक व्यक्त करत आहेत.