Madha Loksabha Election Sanjay Kokate News : माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Loksabha Election) वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjeetsingh  Nimbalkar) पुन्हा उमेदवारी दिल्यानं महायुतीतील घटक पक्ष  नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळच आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय कोकोटे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.  


माढ्यात तुतारीला मिळणार बळ 


दरम्यान, संजय कोकाटे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं माढ्यात तुतारीला बळ मिळालं आहे. शुक्रवारी मुंबईत संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीप प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी देखील पवार गटात प्रवेश केला. दरम्यान रणजितसिंह निंबाळकरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानं संजय कोकाटे नाराज होते. अखेर त्यांनी शिवसेना सोडत पवार गटात प्रवेश केलाय. 


संजय कोकाटे तुमच्याशिवाय तिथं कोणी नाही 


दरम्यान, जयंत पाटील यांनी संजय कोकाटे यांचे पक्षात स्वागत केले. तुम्ही जर पक्ष संघटना बळकट केली तर तुमच्याशिवाय तिथं कोणी नाही असे जयंत पाटील म्हणाले. तुम्ही जर बुथ लेवलपर्यंत संघटना बळकट केली तर तुमचाच सुर्य तुतारीच्या निनादाने उगवेल असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. माढा लोकसभा मतदारसंघात आता तुतारीच वाजणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.  


दस के बाद बस, जयंत पाटलांचा भाजपला टोला


या देशात मतपेटीच्या माध्यमातून क्रांती झाली, ती कधीच कोणाला कळली नाही. या देशात इंदिरा गांधींचा पराभव झाला, अटलबिहारी वाजपेयी यांचा पराभव झाल्याचे जयंत पाटील म्हणाले. आता लोकांना देशात परिवर्तन हवं आहे. आता दस के बाद बस असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. हा पक्ष पवार साहेबांच्या आशिर्वादाने अनेक कार्यकर्त्याने निर्माण केला आहे. या पक्षात कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. लोकबळ ज्याच्या मागं आहे, त्यांना ताकद दिली जाते असे जयंत पाटील म्हणाले. 


माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलीय. मात्र, अद्याप शरद पवारांनी माढ्याचा उमेदवार घोषीत केला नाही. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील ह देखील इच्छुक आहेत. ते शरद पवार गटाच प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरु आहे. 


महत्वाच्या बातम्या:


बबनदादा, संजयमामा, परिचारक  ते कल्याणराव, माढ्यात मोहिते पाटलांना चेकमेट करण्यासाठी फडणवीसांचा प्लॅन!