वाराणसी : लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारत 300 हून अधिक जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचे खरे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत. नरेंद्र मोदी स्वत: उत्तर प्रदेशच्या वाराणसी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले आहेत. नरेंद्र मोदींच्या वाराणसीतील विजयात येथील मुस्लीम महिलांची महत्त्वाची भूमिका राहिली. तीन तलाक आणि समान अधिकार यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या भूमिकेमुळे मुस्लीम महिलांनी त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थन दिलं.


निवडणुकीत मुस्लीम महिलांनी वाराणसीत नरेंद्र मोदींचा प्रचार केला. या महिलांना नरेंद्र मोदींसाठी धार्मिक ग्रथांचं पठणही केलं. नरेंद्र मोदींच्या विजयासाठी या महिलांनी प्रार्थनाही केल्या होत्या. हुस्ना बेगम यांच्यासोबतीने या महिलांनी मोदींसाठी प्रार्थना केल्या.


नरेंद्र मोदींच्या विजयानंतर या सर्व महिलांनी हुस्ना बेगम यांच्या घरी धार्मिक ग्रंथांचं पठन करत अल्लाचे आभार मानले. नरेंद्र मोदींसाठी ज्या दुवा मागितल्या त्या कबूल झाल्या, त्यामुळे आम्ही अल्लाचे आभार मानल्याचं या मुस्लीम महिलांनी सांगितलं.


उत्तर प्रदेशमध्ये भाजपने विरोधकांचा अक्षरश: धुव्वा उडवला. उत्तर सपा-बसपा आघाडीचा भाजपवर काहीही परिणाम झाला नाही. याठिकाणी लोकसभेच्या 80 जागांपैकी भाजप 62, बसपाने 10, सपा 5 आणि काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला.