नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 27 मुस्लीम खासदार संसदेत पोहोचले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मुस्लीम खासदारांची संख्या वाढली आहे. 2014 मध्ये एकूण 23 खासदार संसदेत गेले होते, यावेळी ही संख्या 27 वर पोहोचली आहे. भाजपचे 303 उमेदवार विजय झाले आहेत. भाजपने सात मुस्लीम उमेदवार दिले होते, मात्र यापैकी एकही जिंकू शकला नाही.


जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी श्रीनगरमधून सर्वात मोठा विजय मिळवला आहे. तर उत्तर प्रदेशच्या रामपूरमधून आजम खान, हैदराबादमधून असदुद्दीन ओवेसी आणि आसाममधून बदरुद्दीन अजमल जिंकले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सहा मुस्लीम उमेदवार विजयी ठरले आहेत.


महाराष्ट्र
इम्तियाज जलील (एमआयएम)


आसाम
बदरुद्दीन अजमल (एआईयूडीएफ)
अब्दुल खालिक (काँग्रेस)


बिहार
महबूब अली कैसर (एलजेपी)
डॉ. मोहम्मद जावेद (काँग्रेस)


जम्मू-कश्मीर
फारुक अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फ्रेन्स)
हसनैन मसूदी (नॅशनल कॉन्फ्रेन्स)
मोहम्मद अकबर लोन (नॅशनल कॉन्फ्रेन्स)


तमिलनाडू
मोहम्मद बशीर (आईयूएमएल)
पीके कुनलीकुट्टी (आईयूएमएल)


केरळ
एएम आरीफ (सीपीआईएम)


लक्षद्वीप
मोहम्मद फैजल (राष्ट्रवादी काँग्रेस)


पंजाब
मोहम्मद सादिक (काँग्रेस)


हैदराबाद
असदुद्दीन ओवेसी (एमआयएम)


उत्तर प्रदेश
हाजी फजलुर्रहमान
एसटी हसन
शफीकुर्रहमान बर्क
आजम खान
कुंवर दानिश अली
अफजाल अंसारी


पश्चिम बंगाल
आफरीन अली (टीएमसी)
खलीकुर्रहमान (टीएमसी)
अबु ताहिर खान (टीएमसी)
साजदा अहमद (टीएमसी)
नुसरत जहां (टीएमसी)
अबु हासिम खान (काँग्रेस)


VIDEO | सतराव्या लोकसभेत महाराष्ट्रातून 7 महिला खासदार | एबीपी माझा