शिर्डी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आज आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. शिर्डीत काल (24 एप्रिल) ससाणे यांच्या समर्थकांची बैठक पार पडली. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील यांनीही हजेरी लावली होती. या बैठकीत आपण आज भूमिका स्पष्ट करणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.
अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचं जागेचं मतदान झाल्यानंतर आता शिर्डी लोकसभा जागेसाठी हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील राधाकृष्ण विखे पाटील समर्थकांनी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे याना विरोध केला होता. त्यानंतर काल जयंत ससाणे समर्थकांनी बैठक घेतली आणि विशेष म्हणजे या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली.
या बैठकीत त्यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे विखे पाटील यांनी पुन्हा एकदा युतीच्या बाजूने भूमिका घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. मला पक्षातून बाहेर काढण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असून अनेकांनी देव पाण्यात ठेवल्याची टीका विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.
"काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेला आहे," असा घणाघातही त्यांनी केला. "मी भाजपचा उघड प्रचार केला. मला कशाची भीती? काँग्रेस पक्ष विरोधी पक्षनेत्याच्या मागे उभा राहिला नाही. मग मी माझ्या मुलामागे का उभा राहू नये?" असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. "तसंच माझ्यावर टीका केली, बॅनरवरुन माझे फोटो काढले. काँगेस पक्ष प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झाला की काय?" असा प्रश्नही त्यांनी विचारला.
राधाकृष्ण विखे पाटील आज राजकीय भूमिका स्पष्ट करणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Apr 2019 08:36 AM (IST)
काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील राधाकृष्ण विखे पाटील समर्थकांनी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे याना विरोध केला होता. त्यानंतर काल जयंत ससाणे समर्थकांनी बैठक घेतली आणि विशेष म्हणजे या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -