अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये केले मतदान केले. यावेळी त्यांची एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  मतदानाआधी त्यांनी गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली. मतदान केल्यानंतर त्यांनी आपल्या वाहनामधून पत्रकारांशी संवाद केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपअध्याक्ष अमित शाह देखील उपस्थित होते.



यावेळी मोदी म्हणाले की, देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. माझे भाग्य आहे की मला आज माझे कर्तव्य निभावण्याची सौभाग्य प्राप्त झाले. मी माझ्या मतदारसंघात मतदान करून या लोकशाहीच्या पर्वात सहभाग घेतला आहे. सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केलं.

मतदान केल्यानंतर कुंभच्या मेळ्यात स्नान केल्यानंतर जे भाग्य लाभतं ते भाग्य आज मला लाभलं, असे ते म्हणाले. मतदान केल्याने मला पवित्रता लाभते. लोकशाहीच्या या पर्वात उत्साहात सहभागी व्हा, असे मोदी म्हणाले.

मतदान कुणाला करायचं हे भारतातील मतदारांना समजतं. 21 व्या शतकात जन्मलेल्या आणि पहिल्यांदाच लोकसभेला मतदान करणाऱ्या सर्व युवा मतदारांना या लोकशाहीच्या पर्वात देशातील निर्णायक सरकार बनविण्यासाठीच्या सहकार्यासासाठी शुभेच्छा देतो, असेही मोदी यावेळी म्हणाले.

जगात भारतीय लोकशाहीची वेगळी ताकद आहे. एकीकडे आयईडी हे दहशतवाद्यांचे हत्यार असते. दुसरीकडे लोकशाहीची ताकत ही वोटर आयडी असते. त्यामुळे या वोटर आयडीचे महत्व कळू द्या, असेही मोदी म्हणाले.

तिसऱ्या टप्प्यात महत्वाच्या लढती

तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू काश्मिर, कर्नाटक, केरळ, ओदिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल ही तेरा राज्य आणि दादरा नगर हवेली, दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांतील 116 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. गुरुवार 23 मे 2019 रोजी निकाल जाहीर होणार आहे.

तिसरा टप्पा - (115)

आसाम - 4
बिहार - 5
छत्तीसगड - 7
गुजरात - 26
गोवा - 2
जम्मू काश्मिर - 1
कर्नाटक- 14
केरळ - 20
महाराष्ट्र - 14
ओदिशा - 6
त्रिपुरा - 1
उत्तर प्रदेश- 10
पश्चिम बंगाल - 5
दादरा नगर  - 1
दमण - दीव - 1

भाजपाध्यक्ष अमित शाह हे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले असून गांधीनगरमधून त्यांचा फैसला होईल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पहिल्यांदाच वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय मुलायम सिंह यादव, पप्पू यादव, संबित पात्रा यासारख्या दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार आहे.