हैदराबाद : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात देशात 20 राज्यांमधील 91 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. तेलंगणामध्येही पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. तेलंगणातील सर्वच 17 मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा हैदराबादमधून मैदानात आहेत. या जागेवरून त्यांनी 2004, 2009 आणि 2014 मध्ये निवडणूक जिंकली आहे.


ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मतदानानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, यावेळी एमआयएम तेलंगणासह बाहेर देखील आपला डंका वाजवणार आहे. आमचा पक्ष बिहार आणि महाराष्ट्रात यावेळी खातं उघडेल, असा विश्वास ओवैसी यांनी व्यक्त केला.

यावेळच्या निवडणुकीत पुन्हा एकदा अली आणि बजरंगबलीची चर्चा सुरु झाली आहे. यावर ओवैसी म्हणाले की, आम्ही अलीलाही मानतो आणि बजरंगबलीलाही मानतो. मोदी सरकारकडे काहीच सांगण्यासारखे नसल्याने  धर्माच्या नावावर मतं  मागितली जात आहेत असे त्यांनी सांगितले.

2019 लोकसभासाठी पहिल्या टप्प्यात 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओदिशा, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश आहे.

2019 लोकसभेचा पहिला टप्पा - (91)

आंध्र प्रदेश - 24
अरुणाचल प्रदेश - 2
आसाम - 5
बिहार - 4
छत्तीसगढ - 1
जम्मू काश्मिर - 2
महाराष्ट्र - 7
मणिपूर-1
मेघालय - 2
मिझोराम - 2
नागालँड-1
ओदिशा - 4
सिक्कीम - 1
तेलंगणा- 17
त्रिपुरा- 1
उत्तर प्रदेश - 8
उत्तराखंड - 5
पश्चिम बंगाल - 2
अंदमान निकोबार - 1
लक्षद्वीप - 1

संबंधित बातम्या

Loksabha Election 2019 : देशातील 'या' दिग्गजांचं भविष्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार


Lok Sabha Elections 2019 : मतदान ओळखपत्र नसेल तर काय कराल?


'या' कारणामुळे मतदानाची वेळ दीड तासाने वाढवली

लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी

पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावणार, विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान