असे शोधाल तुम्ही तुमचे मतदान केंद्र
मतदानाचे बूथ शोधण्यासाठी मतदारांना अनेक मार्ग आहेत.
https://electoralsearch.in/ या लिंकवर क्लिक करत तुम्ही मतदान केंद्र शोधू शकता.
‘मतदार हेल्पलाइन अॅप’चा वापर करुनसुद्धा मतदान केंद्र शोधू शकता.
मतदार electoralsearch.in वर जाऊ शकतात किंवा मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदार हेल्पलाईन अॅप वापरू शकतात.
1950 या मतदार हेल्पलाइन नंबरवर कॉल करु शकता. पण हेल्पलाइन नंबरवर कॉल करण्याआधी तुम्हाला तुमचा एसटीडी कोड टाकावा लागणार आहे.
तसेच तुम्ही मेसेजच्या सहाय्यानेही मतदान केंद्र शोधू शकता. मतदाराने <ECIPS> space <EPIC No> टाइप करत 1950 या नंबरवर पाठवत तुम्ही मतदान केंद्राची माहिती मिळवू शकता.
राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (एनव्हीएसपी) National Voters' Service Portal (NVSP) च्या वेबसाइटवर जाऊन देखील मतदान केंद्र शोधू शकता.
VIDEO | देशाचे पहिले मतदार... श्याम सरण नेगी 'माझा'वर | वोटर नंबर 1 | एबीपी माझा