जालना : जालना लोकसभा निवडणूक रंगात येत असताना आज पहिला उमेदवारी अर्ज भरण्याचा मान एका नवरदेवाने मिळवला. अपक्ष उमेदवार म्हणून जालना लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या सुदाम इंगोले या तरुणाने नवरदेवाच्या पोशाखात आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. 


VIDEO | जालन्यात मांडवात जाण्याआधी नवरदेवाने भरला लोकसभा निवडणुकीचा अर्ज | एबीपी माझा




विशेष म्हणजे आज त्याच्या लग्न मुहूर्ताच्या अगोदर आधी लगीन लोकशाहीचं म्हणत सुदाम इंगोले यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. लग्न मंडपाअगोदर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अवतरलेला नवरदेव सर्वांच्याच कुतुहलाचा विषय ठरला. 

 




जालना जिल्ह्यातील धारकल्यान गावचा रहिवासी असलेला सुदामचे शिक्षण एमए झालेलं आहे. 



जालन्याची जागा शिवसेना-भाजपसाठी डोकेदुखी बनली होती.  शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून माघार घेतल्याने भाजपकडून रावसाहेब दानवेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. युतीच्या औरंगाबादमधील मेळाव्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात बैठक पार पडली होती. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी अर्जुन खोतकरांचं मतपरिर्वन केलं होतं.