लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्याच्या दुष्काळी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवारही आहेत. विशेष म्हणजे रोहित पवार दुष्काळी भागात बारामती अॅग्रोच्या माध्यमातून काम करत आहेत.
आज अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात ते पोहोचताच गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि रोहित पवारांना उमेदवारी देण्याची मागणी केली.
सध्या कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे विद्यमान आमदार आहेत. गावकऱ्यांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने रोहित पवार यांना उमेदवारी दिली, तर राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशी चुरशीची लढत होईल, यात शंका नाही.
दरम्यान, स्वागत करणाऱ्यांना गावकऱ्यांना शरद पवारांनी दटावलं. दुष्काळ असताना स्वागत कसलं करता, असा दम त्यांनी दिली. यानंतर पवारांनी गावकऱ्यांच गाऱ्हाणं ऐकून घेतलं. मग प्रवास सुरु झाल्यावर शरद पवार हसत हसत रोहित पवार यांना म्हणाले की, 'तुझी मागणी झाली बघ'.
कोण आहेत रोहित पवार?
- रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे पुत्र आहेत.
- राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू.
- राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री आप्पासाहेब पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे बंधू.
रोहित पवार सध्या भूषवत असलेली पदं
1. मुख्य कार्यकारी अधिकारी, बारामती अॅग्रो लिमिटेड
2. अध्यक्ष, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन
3. उपाध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन
4. संचालक, आयएसईसी
5. नियमक मंडळ सदस्य, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट
6. कार्यकारी सल्लागार समिती सदस्य, इंडियन पोल्ट्री इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडिया
संबंधित बातम्या
रोहित पवारांचं लॉचिंग, विधानसभा निवडणुकीच्या मैदानात दिसणार?
साहेब, आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा, नातू रोहित पवारांचं आजोबांना आवाहन
'पानी फाउंडेशन'च्या महाश्रमदानासाठी पवारांचे नातू रोहित यांच्या हाती कुदळ-फावडं