हैदराबाद : मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जला अंतिम सामन्यात एका धावेने पराभूत करुन चौथ्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आणि विक्रम प्रस्थापित केला. हैदराबादमध्ये रविवारी (12 मे) खेळवलेल्या अतिशय थरारक सामन्यात मुंबईने चेन्नईवर अखेरच्या चेंडूवर एका धावेने विजय मिळवाला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा मेंटॉर सचिन तेंडुलकरने चेन्नईच्या पराभवाचं कारण सांगितलं. कर्णधार महेंद्रसिंह धोनी धावचीत होणं हे चेन्नईच्या पराभवाचं महत्त्वाचं कारण असल्याचं सचिन म्हणाला.


'धोनी बाद होणं हा सामन्याचा टर्निंग पॉईंट'

चेन्नईच्या डावाच्या तेराव्या षटकात कर्णधार महेंद्र सिंह धोनी दोन धावा करुन बाद झाला. ईशान किशनच्या थ्रोवर धोनी धावचीत झाला. धोनीने ओव्हर थ्रोवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण ईशान किशनने थेट स्टंपवर निशाणा साधला आणि धोनी पॅव्हेलियनमध्ये परतला.

1148657313


धोनी बाद झाला आणि सामना फिरला, असं सचिनने सांगितलं. याशिवाय जसप्रीत बुमराची गोलंदाजीही फार महत्त्वाची ठरल्याचं सचिन तेंडुलकरने सांगितलं. तो म्हणाला की, "मलिकांचं एक षटक अतिशय महागडं ठरलं, पण नंतरच्या षटकात बुमराने काही प्रमाणात समतोल साधला. बुमराने चार षटकांत केवळ 14 धावा देऊन एक विकेटही घेतली.

शॉन वॉर्नची 80 धावांची खेळी

दुसरीकडे शेन वॉटसनवरही दबाव वाढला. हा क्षण फार महत्त्वाचा होता, असं सचिनने सांगितलं. शेन वॉटसनने तीन जीवदानांचा लाभ उठवून 80 धावांची तुफानी खेळी केली, पण संघासाठी तो विजय मिळवून देऊ शकला नाही. सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर अनुभवी लसिथ मलिंगाने शार्दुल ठाकूरला पायचीत करुन सामना आणि ट्रॉफी मुंबईला मिळवून दिली.

मुंबई इंडियन्स चौथ्यांदा चॅम्पियन, चेन्नई सुपरकिंग्सवर एका धावेने थरारक विजय

चहर आणि पंड्याचं कौतुक

सचिनने फिरकीपटू राहुल चहर याचंही कौतुक केलं. तो म्हणाला की, "मी पहिल्या सामन्यानंतरच चहरबद्दल माझं मत मांडलं होतं आणि चहरने दमदार कामगिरी केली असं मला वाटतं. फिरकीपटूंनी उत्तम गोलंदाजी केली आहे." सोबतच सचिन तेंडुलकर हार्दिक पंड्याचं कौतुक करायलाही विसरला नाही. "पंड्याने अनेक महत्त्वाच्या क्षणी संघासाठी उत्तम खेळी केली आहे," असं सचिनने सांगितलं.

मुंबईला आयपीएलचं चौथ्यांदा विजेतेपद

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 8 विकेट्सच्यो मोबदल्यात 149 धावा केल्या. 'सी-सॉ'प्रमाणे हा सामना रंगला. अखेर मुंबईने पराभवाच्या तोंडातून विजय मिळवला आणि आयपीएलची ट्रॉफीही चौथ्यांदा आपल्या नावावर केली. चेन्नईच्या संघाला 20 षटकात 7 विकेट्सच्या मोबदल्यात 148 धावा करता आल्या.