Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 13 मे 2019 | दिवस माझा
एबीपी माझा वेब टीम | 13 May 2019 09:35 AM (IST)
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
मेष- आज कार्यक्षेत्रात सुरेख वाटचाल होईल. वरिष्ठांकडून कामामध्ये सहकार्य लाभेल. महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. वृषभ- आज वरिष्ठांकडून कामामध्ये सहकार्य लाभेल. जमिनीसंबंधित प्रश्नांवर तोडगा निघेल. मिथुन- कार्यक्षेत्रामध्ये लाभ होण्याची शक्यता. संततीसोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता. कर्क- खर्च वाढल्याने आजच्या दिवसात चिडचिड होईल. विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध खर्च करावा. सिंह- नोकरी, व्यवसायात नवीन संधी मिळतील. पत्नीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. कन्या- आजचा दिवस धावपळीचा असेल. आजच्या दिवसात खर्चावर नियंत्रण ठेवा. तूळ- आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल. बॅकिंग, फायनान्स क्षेत्रातील व्यक्तिंसाठी भाग्योदयी दिवस असेल. वृश्चिक- आज घरामध्ये व्यतीत होणारा दिवस आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. धनु- आजचा दिवस संततीबाबत लाभाचा ठरेल. नोकरी, व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. मकर- आजच्या दिवसात प्रकृतीची काळजी घ्यावी. आज महत्वाचे निर्णय घेणं टाळावं. कुंभ- विवाह इच्छुकांसाठी विवाहाच्या संधी उपलब्ध होतील. आजचा दिवस आनंददायी असेल. मीन- महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. गुंतवणूक विचारपूर्वक करावी.