नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज सात उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीत बिहार, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश आणि पंजाबच्या उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत माजी  केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेशच्या गुना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांना पंजाबच्या आनंदपूर साहिबमधून मैदानात उतरवण्यात आलं.

काँग्रेसच्या या यादीत शाश्वत केदार यांना बिहारच्या बाल्मिकी नगरमधून, रिगजिन स्पालबार यांना जम्मू-काश्मीरच्या लडाखमधून, शैलेंद्र पटेल यांना मध्य प्रदेशच्या विदिशामधून, मोना सुसतानी यांना मध्य प्रदेशच्या राजगडमधून तर केवल सिंह धिल्लों यांना पंजाबच्या संगरुरमधून तिकीट देण्यात आलं आहे.


ज्योतिरादित्य शिंदे हे सध्या गुना मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांना त्याच मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना पश्चिम यूपी काँग्रेसचं प्रभारीपद दिल्यानंतर ते निवडणूक लढवणार नाहीत, अशी अटकळ बांधली जात होती. पण यादी जाहीर झाल्यानंतर सगळ्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे.