सोलापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काही ज्येष्ठांच्या पराभवामध्ये वंचित बहुजन आघाडी मोठा वाटा उचलला आहे. वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामध्ये 41 लाखाहून अधिक मते मिळाली. महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने काय कमाल केली याची आकडेवारी समोर आली आहे.


मात्र वंचित बहुजन आघाडीला एकही जागा न मिळण्यामागे दलित आणि मुस्लिमांनी एकमेकांना मतदान केलं नाही हे देखील स्पष्ट होत आहे. या निवडणुकीने शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेतृत्वाविषयी अनेक प्रश्नचिन्ह उभा केले


प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्राच्या 48 लोकसभा मतदारसंघातून 41 लाख 32 हजार 500 मते मिळाली. वंचितला जेवढी मते मिळाली त्याहून कमी मते राज ठाकरे यांच्या मनसेला 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत वंचितला कमीत कमी दीड टक्का ते जास्तीत जास्त 32.47 टक्के एवढी प्रचंड मते मिळाली आहेत.


प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये फार कमी फरकाने विजय मिळतो. त्यामुळे वंचितता मिळालेल्या मतांचा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र काय आहे हे पाहणेही महत्त्वाचं आहे.


विधानसभेच्या 288 जागांपैकी




  • 78 विधानसभा मतदार संघात वंचिताच्या उमेदवाराला सरासरी 25 ते 35 हजार मते मिळाली.

  • 18 विधानसभा मतदारसंघात सरासरी 15 हजारहून अधिक मते मिळाली.

  • 60 विधानसभा मतदारसंघात सरासरी 10 हजाराहून अधिक मते मिळाली.

  • 132 विधानसभा मतदारसंघात सरासरी नऊ हजारांवरून अधिक मते मिळाली.


विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या पेक्षाही सांगलीचे उमेदवार गोपीचंद पडळकर आणि इम्तियाज जलील यांना अधिक मते मिळाली आहेत.


त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना दलित समाजाने भरभरुन मते दिली असं एकूण दिसत आहे. मात्र बारा बलुतेदार, आठरा अलुतेदारसह मुस्लीम मतदारांची मोट बांधण्याचा आंबेडकरांचा प्रयोग यशस्वी झाला नाही. वंचितला मिळालेली मते पाहता आंबेडकरांची दलित समाजामध्ये एक मोठी वोट बँक आहे हे स्पष्ट झालं. पण असादुद्दीन ओवेसी हे मात्र मुस्लिमांचे एकमात्र नेते नाहीत हे ठळकपणे दिसून आलं.


VIDEO | महाराष्ट्रात कोण विजयी कोण पराभूत ? | एबीपी माझा