मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीचा चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील हा शेवटचा टप्पा आहे. महाराष्ट्राच्या या चौथ्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 17 पैकी 4 राखीव जागांवरील मतदान सर्वाधिक झाले आहे. राखीव असलेल्या चारही मतदारसंघात 20  टक्क्यांपेक्षाही जास्त मतदान झाले आहे. तर शहरी भागात मात्र ही टक्केवारी कमी असल्याचे दिसून येत आहे. सकाळी 11 पर्यंत कल्याणमध्ये सर्वात कमी 14  टक्के तर दक्षिण मुंबई 15.51 टक्के मतदान झाले आहे.


अर्थात दुपारनंतर मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

चौथ्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत आकडेवारी

सतरापैकी चार मतदारसंघ राखीव...तेच टॉपर

1.       नंदुरबार                   24.59%

2.       पालघर                              21.46%

3.       दिंडोरी                               21.06%

4.       शिर्डी                      20.55%

शहरी मतदारसंघ...मतदानात तळाला!

1.       कल्याण                            13.91%

2.       दक्षिण मुंबई              15.51%

3.       मुंबई उत्तर मध्य                  16.21%

4.       मुंबई दक्षिण मध्य       16.80%

लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 14 मतदारसंघांमध्ये  सरासरी 61. 83 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या टप्प्यात 1 कोटी 59 लाख 45 हजार 795 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल होता. महत्त्वाची बाब म्हणजे हातकणंगलेत सर्वाधिक 70.81 टक्के मतदान झालं, तर पुणेकर मतदारांनी मात्र निराशा केली, पुण्यात केवळ 47.97 टक्के मतदान झाले होते. या टप्प्यात कोल्हापूर - 69.51 टक्के, हातकणंगले - 70.81 टक्के, सांगली - 64.45 टक्के , जालना - 64.57  टक्के, अहमदनगर - 63.93 टक्के, माढा - 63.58 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 61.91 टक्के, औरंगाबाद - 61.87 टक्के, बारामती - 60  टक्के, रायगड - 61.94 टक्के, जळगाव -  56.10 टक्के, रावेर -  61.37 टक्के, सातारा - 60.01  टक्के, पुणे - 47.97 टक्के अशी एकूण 61. 83 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

तर दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सरासरी 62.91 टक्के मतदानाची नोंद झाली होती. यामध्ये हिंगोली - 66.60 टक्के, बीड - 66.08टक्के, उस्मानाबाद- 63.42 टक्के, नांदेड- 65.16 टक्के, परभणी- 63.16 टक्के, लातूर- 62.20 टक्के, बुलडाणा- 63.68 टक्के, अमरावती - 63.86 टक्के, अकोला- 60 टक्के, सोलापूर- 58.45 टक्के अशी मतदारसंघनिहाय टक्केवारी होती.

पहिल्या टप्प्यात मतदान पहिल्या टप्प्यामध्ये 63.04 टक्के मतदान झाले होते.