मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळपासून सुरु आहे. राज्यातही 14 मतदार संघांमध्ये मतदान सुरु आहे. दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात 35.70 टक्के मतदान झाले आहे. कोल्हापुरात सर्वाधिक 42.04 टक्के मतदान झाले असून पुण्यात सर्वात कमी 27.17 टक्के मतदान झाले आहे.


दुपारी 1 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडणारे पुणेकर आज मतदानासाठी तरी बाहेर पडतील की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतदेखील मतदानाच्या टक्केवारीत पुणे सर्वात तळाला असेल, असे चित्र पाहायला मिळत आहे.

मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी
1. बारामती – 21 लाख 12 हजार 408 पैकी 7 लाख 51 हजार 895 मतदारांनी मतदान केलं आहे.
2. जालना - 18 लाख 65 हजार 20 पैकी 7 लाख 7 हजार 29 मतदारांनी मतदान केलं आहे.
3. माढा - 19 लाख 4 हजार 845 पैकी 6 लाख 36 हजार 408 मतदारांनी मतदान केलं आहे.
4. अहमदनगर – 18 लाख 54 हजार 248 पैकी 6 लाख 43 हजार 980 मतदारांनी मतदान केलं आहे.
5. कोल्हापूर – 18 लाख 74 हजार 345 पैकी 7 लाख 87 हजार 974 मतदारांनी मतदान केलं आहे.
6. हातकणंगले - 17 लाख 72 हजार 563 पैकी 7 लाख 3 हजार 352 मतदारांनी मतदान केलं आहे.
7. औरंगाबाद – 18 लाख 84 हजार 865 पैकी 6 लाख 67 हजार 620 मतदारांनी मतदान केलं आहे.
8. सांगली – 18 लाख 3 हजार 53 पैकी 6 लाख 23 हजार 135 मतदारांनी मतदान केलं आहे.
9. सातारा – 18 लाख 38 हजार 987 पैकी 6 लाख 40 हजार 703 मतदारांनी मतदान केलं आहे.
10. पुणे -  20 लाख 74 हजार 861 पैकी 5 लाख 63 हजार 739 मतदारांनी मतदान केलं आहे.
11. रायगड - 16 लाख 51 हजार 560 पैकी 6 लाख 39 हजार 814 मतदारांनी मतदान केलं आहे.
12. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 14 लाख 54 हजार 524 पैकी 5 लाख 80 हजार 791 मतदारांनी मतदान केलं आहे.
13. जळगाव मतदार संख्या - 19 लाख 25 हजार 352 पैकी 6 लाख 37 हजार 672 मतदारांनी मतदान केलं आहे.
14. रावेर - 17 लाख 73 हजार 107 पैकी 6 लाख 23 हजार 247 मतदारांनी मतदान केलं आहे.

मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी 

जळगाव - 33.12
रावेर - 35.15
जालना - 37.91
औरंगाबाद - 35.42
रायगड - 38.74
पुणे - 27.17
बारामती - 35.58
अहमदनगर - 34.73
माढा - 33.41
सांगली - 34.56
सातारा - 34.84
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 39.93
कोल्हापूर - 42.04
हातकणंगले- 39.68