गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अर्ज भरण्यास उत्सुक उमेदवारांची निराशा
एबीपी माझा वेब टीम | 01 Apr 2019 07:48 PM (IST)
6 एप्रिल म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरता यावा, यासाठी उमेदवारांनी लेखी मागणी केली होती. मात्र गुढीपाडव्याला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे या दिवशी अर्ज भरता येणार नाही.
मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरताना बहुतांश उमेदवार शुभ मुहूर्त पाहताना दिसत आहेत. अवघ्या काही दिवसात हिंदू नवीन वर्षाला सुरुवात होत असल्यामुळे गुढीपाडव्याला अर्ज भरण्याचा अनेकांचा मानस आहे. मात्र चौथ्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त पाहणाऱ्या उमेदवारांचा भ्रमनिरास झाला आहे. चौथ्या टप्प्यातील मुंबई-ठाण्यातील मतदारसंघांसाठी उद्यापासून अधिसूचना जारी होणार आहे. पुढील मंगळवार, म्हणजेच 9 एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्रं सादर करता येणार आहेत. 6 एप्रिल म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरता यावा, यासाठी उमेदवारांनी लेखी मागणी केली होती.