नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सकाळी नऊ वाजेपर्यंत 543 जागांमध्ये एनडीए 260 जागांवर होती. इंडिया आघाडीनं देखील 180 जागांचा टप्पा पार केला आहे. लोकसभेच्या मतमोजणीत एनडीए आणि इंडिया यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
सकाळी 9 वाजेपर्यंतच्या कलानुसार एनडीए 260 जागांवर आघाडीवर होती. तर, इंडिया आघाडी 180 जागांवर आघाडीवर होती. तर इतरांच्या खात्यात 12 जाताना पाहायला मिळाल्या होत्या.
देशात कोण आघाडीवर?
देशात एनडीए आणि इंडिया आघाडीत कडवी लढत पाहायला मिळत आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सकाळी नऊ वाजेपर्यंत भाजप प्रणित एनडीएनं आघाडी घेतली होती. एनडीएमधील इतर मित्र पक्षांच्या तुलनेत भाजपनं चांगली कामगिरी केली आहे.
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात कांटे की टक्कर पाहयाला मिळत आहे. भाजपला उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसनं टक्कर दिली आहे. गुजरात मध्ये भाजप आघाडीवर आहे. तर, केरळमध्ये एलडीएफ आणि यूडीएफमध्ये कांटे की टक्कर आहे.
तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि द्रमुक यांच्या आघाडीनं यश मिळवलंय. तर, राजस्थानमध्ये देखील काँग्रेस आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळतेय.
सकाळी 9 वाजेपर्यंत काँग्रेसनं देखील कडवी लढत दिली आहे. काँग्रेसला 2019 च्या लोकसभा निवडणूक 54 जागा मिळाल्या होत्या. यावेळी काँग्रेसनं मोठी आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं सकाळी सुरुवातीच्या कलांमध्ये 150 जागांवर आघाडीवर होती. तर भाजप 251 जागांवर आघाडीवर आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या अंतिम निकालात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मॅजिक फिगरसाठी कांटे की टक्कर ?
देशात लोकसभा निवडणुकीच्या 543 जागा आहेत. बहुमतासाठी 272 जागा ही मॅजिक फिगर आहे. सध्या भाजप मॅजिक फिगरच्या खाली असली तरी कांटे की टक्कर सुरु आहे. भाजपनं 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 303 जागा मिळवल्या होत्या. यावेळी भाजप किती जागा मिळवणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी अनुक्रमे वाराणसी आणि गांधीनगरमधून आघाडी घेतली आहे.
महाराष्ट्राचं चित्र काय?
महाराष्ट्रात देखील महायुती आणि महाविकास आघाडीत कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात महायुती 20 जागांवर तर महाविकास आघाडी 24 तर दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.
संबंधित बातम्या :