Aishwarya Narkar : एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या कायमच त्यांच्या अभिनयामुळे आणि त्यांच्या सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. वयाच्या 40 नंतरही ऐश्वर्या नारकर यांच्या फिटनेसचेही बरेच फॅन आहेत. तसेच त्यांच्या सोशल मीडियावरच्या फोटोंवरही अनेकजण फिदा झाल्याचं पाहायला मिळातं. त्यातच त्यांनी नुकतच त्यांच्या सोशल मीडियावरुन नुकतच आस्क मी एनिथिंग हे फिचर वापरलं. त्यामध्ये अनेकांनी त्यांना बरेच प्रश्न विचारलं. 


ऐश्वर्या नारकर यांना त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी बरेच प्रश्न विचारलेत. त्यातच ऐश्वर्या नारकर यांना एका चाहत्याने फार भन्नाट प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी देखील कुठलेही आढेवेढे न घेता अगदी भन्नाट उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. सध्या त्यांच्या या उत्तराची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.                                            






ऐश्वर्या नारकर यांनी दिलं भन्नाट उत्तर


एका चाहत्याने ऐश्वर्या नारकर यांना लग्नानंतर कुणी प्रपोज केलं आहे का? ज्याला माहित नसेल की तुमचं लग्न झालेलं आहे. त्यावर ऐश्वर्या नारकर यांनी म्हटलं की, सगळ्यांना माहितेय. म्हणजेच सगळ्यांना माहितेय माझं लग्न झालं आहे ते, असं ऐश्वर्या नारकर यांना म्हणायचं आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या या उत्तराची बरीच चर्चा सुरु आहे. 


 


ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल


ऐश्वर्या नारकर या सध्या झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. त्यांची ही खलनायिकेची भूमिका प्रेक्षकांच्या देखील बरीच पसंतीस पडत आहे. तसेच ऐश्वर्या नारकर यांनी या सुखांनो या, लेक माझी लाडकी, स्वामिनी, श्रीमंताघरची सून यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये, तसेच यलो, धडक यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.   






ही बातमी वाचा : 


Mirzapur 3 OTT Release : 'मिर्जापूर 3'ची रिलीज डेट ढकलली पुढे? प्राईम व्हिडीओने चाहत्यांना टाकलं गोंधळात