ABP Cvoter Exit Poll 2024 कोलकाता : देशातील सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आहे. एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपला देशभरात विविध राज्यात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये देखील एक्झिट पोलचा अंदाज या प्रमाण आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या जागा घटण्याची शक्यता आहे. तर, भाजपच्या जागा वाढण्याचा अंदाज आहे.  


एबीपी सी-वोटर ने एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले आहेत. पश्चिम बंगालमधील 42 जागांसाठी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार भाजप प्रणित एनडीएला 23 ते 27 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, तृणमूल काँग्रेसला 13-17 जागा मिळू शकतात. इंडिया आघाडीला 1-3 जागांवर यश मिळू शकतं. 


एक्झिट पोलचे अंदाज आणि 2014  आणि 2019 च्या निवडणूक निकालांची तुलना केल्यास यावेळी टीएमसीला मोठा धक्का बसू शकतो. टीएमसीला 2019 च्या निवडणुकीत 12 जागांचा फटका बसला होता. तर भाजपच्या जागा वाढल्या होत्या. 2019 ला भाजपच्या 16 जागा वाढल्या होत्या. 


2014 मध्ये टीएमसीला 34 जागा मिळाल्या होत्या. तर, 2019 मध्ये टीएमसीला 22 जागा मिळाल्या होत्या. आता 2024 मध्ये टीएमसीच्या जागा घटण्याची शक्यता आहे. टीएसीला 13-17 जागा मिळू शकतात.  


भाजपला 2014 लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये 2 जागांवर विजय मिळवला होता.2019 ला भाजपला लोकसभा निवडणुकीत 18 जागा मिळाल्या होत्या. 2014 ते 2019  मध्ये भाजप 2 जागांवरुन पश्चिम बंगालमध्ये 18  जागांवर पोहोचलं होता. 


भाजपला मोठं यश मिळणार? 


लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. भाजपनं गेल्या दोन निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मोठं यश मिळवलं आहे. आता या निवडणुकीत टीएमसीला धक्का देत भाजप यश मिळवणार का हे पाहावं लागेल. याशिवाय देशात पुन्हा एकदा भाजप प्रणित एनडीएचं सरकार येण्याची शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजात वर्तवण्यात आला आहे. भाजप स्वबळावर 315 जागा मिळवेल, असा अंदाज एबीपी सी वोटरनं केलेल्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर, काँग्रेसला देखील गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काही जागांचा फायदा दिसतोय. काँग्रेसला 74 जागा मिळण्याची शक्यता आहे.  


दरम्यान, एबीपी सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार केंद्रात भाजपला मोठं यश मिळू शकतं. एक्झिट पोल जाहीर करणाऱ्या इतर संस्थांच्या आकडेवारीनुसार देखील भाजप प्रणित एनडीएची पुन्हा एकदा सत्ता केंद्रात येऊ शकते. 


संबंधित बातम्या :


ABP Cvoter Exit Poll 2024: महाराष्ट्रात मविआ 23, महायुती 24, ठाकरेंना 9, अजित पवारांना एका जागेचा अंदाज


Nagpur Lok Sabha Exit Poll 2024 : विदर्भात कुणाचा झेंडा फडकणार? नागपूरसह विदर्भातील उमेदवारांचा निकाल काय?