Lok Sabha Poll of Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीचा क्लायमॅक्स अगदी जवळ आलाय. 19 एप्रिलपासून सुरु झालेल्या लोकसभेच्या (Lok Sabha Election) मतादानाची धामधूम आज संपली आहे. आता उत्सुकता आहे चार जून 2024 रोजी देशात कुणाचं सरकार येणार, हे स्पष्ट होणार आहे. त्याआधी आज देशातील विविध एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. मोदींची जादू पुन्हा चालणार? की जनता नवा पर्याय निवडणार. याचं उत्तरही तीन दिवसांत मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाची पुढची दिशा 2024 ची निवडणूक ठरवणार आहे..या निवडणूकीचे निकाल स्पष्ट करतील कुणासोबत सहानुभूती आहे तर कुणासोबत जनमत. कोण गाठणार मॅजिक फिगर तर कुणाच्या हाती जाणार सत्तेचा ट्रिगर. मोदींची जादू पुन्हा चालणार? की जनता नवा पर्याय निवडणार. राम मंदिर, आर्टिकल ३७०, ट्रिपल तलाक, आरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा, अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी कोणता मुद्दा गेमचेंजर ठरणार..? निकालाआधी जनतेचा कल कुणाच्या बाजूने हे सांगणाऱ्या सर्व एक्झिट पोलची आकडेवारी इथं आम्ही सांगणार आहोत.
2024 एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा मिळतील ? कुणाचं सरकार स्थापन होईल ?
एक्झिट पोल एजन्सी | एनडीए | यूपीए | अन्य |
1. News18 Mega Exit Poll | 355-370 | 125-140 | 42-52 |
2.Jan Ki Baat | 363-392 | 141-161 | 10-20 |
3. CNX. | 371-401 | 109-139 | 28-38 |
4. ABP News-CVoter |
231-275 | 122-161 | 02-10 |
5. Republic-Matrize | 353-368 | 118-133 | 43-48 |
6. INDIA TODAY - AXIS MY INDIA | 161-180 | 79-100 | 3-11 |
7. DAINIK BHASKAR | 281-350 | 145-201 | 33-49 |
8. INDIA TV | 371-401 | 109-139 | 28-38 |
9. TV9 पोलस्ट्राट | 216 | 134 | 21 |
10. Republic TV PMARQ | 359 | 154 | 30 |
11. News Nattion | 342-378 | 153-159 | 21-23 |
2019 मध्ये एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला -
2019 एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला होता. 2019 लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएनं 543 मधील 353 जागांवर विजय मिळवला होता. नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांद सत्ता स्थापन केली. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागांवर विजय मिळवला. 2014 मध्ये भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये काँग्रेस प्रणित युपीएला 91 जागा मिळाल्य होत्या. काँग्रेसला 51 जागा मिळाल्या होत्या.
2019 एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा मिळल्या होत्या ?
एक्झिट पोल एजन्सी | एनडीए | यूपीए | अन्य |
1. News18-IPSOS | 336 | 82 | 124 |
2. India Today-Axis My India | 339-365 | 77-108 | 82 |
3. News24-Todays Chanakya | 350 (+/-14) | 95 (+/-9) | 97 (+/-11) |
4. Times Now-VMR | 306 | 132 | 104 |
5. India TV-CNX | 300 (+/-10) | 120 (+/-5) | 122 (+/-6) |
6. ABP-CSDS | 277 | 130 | 135 |
7. India News-Polstrat | 287 | 128 | 127 |
8. CVoter | 287 | 128 | 127 |
9. Newsx Neta | 242 | 164 | .... |
Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सर्व्हे करणाऱ्या प्रत्येक संस्थेने देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.