Lok Sabha Election 2024 Date LIVE : महाराष्ट्रात 5 टप्यात होणार निवडणुका; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती

Lok Sabha Election 2024 Date LIVE Updates : लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत घोषणा केली

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 16 Mar 2024 04:29 PM

पार्श्वभूमी

Election Commission to announce the schedule for General Elections 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त एस.एस.सिंह आणि...More

Lok Sabha Election 2024 Dates LIVE : महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान

Lok Sabha Election 2024 Dates LIVE : पहिला टप्पा  : मतदान- 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर  (विदर्भातील 5)


दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ - 8) 


तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ - 11 )


चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड  (एकूण मतदारसंघ - 11 )


पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ - 13 )