मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना-भाजप दोन्ही पक्ष स्वतंत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना भेटणार आहेत. मात्र ही भेट राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना नेते दिवाकर रावते सकाळी 10.30 वाजता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 वाजता राज्यपालांना भेटणार आहेत. दोन्ही भेटी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्यातरी सध्या सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांकडून सुरु असलेल्या रस्सीखेचीदरम्यान ही भेट महत्त्वाची ठरत आहे.
VIDEO | निकालाचे आकडे बदलले, शिवसेना नेत्यांची भाषाही बदलली | स्पेशल रिपोर्ट
शिवसेना-भाजप गेल्या पाच वर्षांपासून एकत्र सरकार चालवत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांना एकत्रित भेटणे अपेक्षित होतं. मात्र तसं न झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटींतून एकप्रकारे सत्तास्थापनेचे संकेत दिले जात आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप 105 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेना 56 जागा जिंकत दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिवसेनेने सोबत युती अनिवार्य आहे. त्यामुळेच शिवसेना आक्रमक पाहायला मिळत आहे.
शिवसेनेनं भाजपकडे मुख्यमंत्री पदाची मागणी करत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री या फॉर्म्युल्याची आठवण करुन दिली आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या मागण्या मान्य करणार का? दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार की शिवसेना बोलतेय त्याप्रमाणे इतर पर्याय अमलात आणणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
VIDEO | भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजू शकत नाही : उद्धव ठाकरे
संबंधित बातम्या
- मुख्यमंत्रीपद आमची प्रथम मागणी, उपमुख्यमंत्रीपद नंतरचा विषय : शिवसेना
- महाराष्ट्राच्या कॅनव्हासमध्ये शिवसेनाच रंग भरेल, तो ब्रश उद्धव ठाकरेंच्या हाती : संजय राऊत
- भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजून घेऊ शकत नाही : उद्धव ठाकरे
- भाजप अध्यक्ष अमित शाह 30 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर; उद्धव ठाकरेंना भेटणार का? याकडे सर्वांच लक्ष
- शिवसेनेची ताकद वाढली, बच्चू कडूंसह चार आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा
- 'शेर कितना भी भूखा हो घास नहीं खाता', मुख्यमंत्रीपदाबाबत सुधीर मुनगंटीवारांचे सूचक वक्तव्य