Krishnaraaj Mahadik on Kolhapur Municipal Corporation Election: भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना रुईकर कॉलनी महाडीक कॉलनी या प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे म्हटलं आहे. हा संपूर्ण आदेश मला पक्षाकडून मिळाला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राजकीय पाऊल आता उचलत असल्याचेही कृष्णराज यांनी म्हटलं आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही आदेश दिल्याचे त्यांनी नमूद केले. 

Continues below advertisement

कोल्हापूर अशा लोकांच्या हातात पडलं होतं..

तिकीट मिळण्यामध्ये कुटुंबाचा सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले, माझ्या संपूर्ण ह्या तिकीटच्या किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये येण्याचा माझ्या कुटुंबाचा कुठलाही भाग नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. हा संपूर्ण आदेश मला पक्षाकडून मिळाला आहे असे ते म्हणाले. कोल्हापूर अशा लोकांच्या हातात पडलं होतं ज्यांना गतीने तिथे विकास करता आला नाही पण आता आम्ही ते सगळं मोडून काढणार आहे असल्याचे ते म्हणाले. कृष्णराज म्हणाले, मी फार उत्साही आहे कारण राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची आणि सुरुवात करण्याची इच्छा होती. आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते होणार आहे त्यामुळे मला फार आनंद आहे. मला माझ्या संपूर्ण परिवाराचा पण फार अभिमान आहे. आता तिसरी पिढी त्यामध्ये येत आहे. त्यामुळे फार चांगलं वाटत आहे. कारण या सर्वांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातूनच आजपर्यंत काम केलं आहे. 

ज्या ठिकाणी प्रचारासाठी गेलो त्या सीट्स निवडून आल्या

प्रभागाबद्दल बोलताना ते म्हणाले, रुईकर कॉलनी महाडीक कॉलनी ज्या प्रभागामध्ये मी राहतो सुद्धा आणि माझा ऑफिस सुद्धा तिथेच आहे. माझं संपूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून जे सामाजिक उपक्रम पण आपण जे काही बघता ते संपूर्ण कामकाज त्या ऑफिसमधूनच होतं. त्या प्रभागाच्या बऱ्याच लोकांशी आमचा संपर्क खूप चांगला आहे त्यामुळे त्या प्रभागातून आता तयारी करत आहे. त्यांनी सांगितले की, मी आता गेले काही महिने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सक्रियपणे प्रचारात होतो. ज्या ठिकाणी प्रचारासाठी गेलो त्या सगळ्या सीट्स निवडून सुद्धा आल्या. मला आनंद आहे की मी एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट युवापिढीमध्ये क्रिएट करू शकलो. त्यांच्यासमोर खूप चांगले मुद्दे मांडू शकलो.

Continues below advertisement

कोल्हापूरमध्ये प्लॅनिंगचा अभाव

प्रभाग तीनपुरते मर्यादित न राहता कोल्हापूर शहरासाठी काम करण्याबद्दल ते म्हणाले, मी फक्त वॉर्ड तीनसाठी मर्यादित नाही. संपूर्ण कोल्हापूर शहराच्या दृष्टिकोनाने या निवडणुकीच्या सामोरे जात आहे. मागील दोन वर्षापासून मी सक्रियपणे तिथं काम करतोय आणि अनेक अडी अडचणी आहेत ज्याच्यावर मला काम करायचे आहेत. ते म्हणाले की, कोल्हापूरमध्ये प्लॅनिंगचा अभाव असून व्यवस्थित पद्धतीने प्लॅनिंग केलं तर डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. अनेक ठिकाणी निधी लावला जातो, त्याचे मेंटेनन्स केलं जात नाही आणि परत भविष्यात त्याला निधी आणावा लागतो त्यामुळे अशा प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी असं झाल की निधी वाया सुद्धा जात आहे. शेवटी लोकांचे टॅक्स  भरून आलेले पैसे असतात. त्यामुळे हे एकदम व्यवस्थितपणे वापरणं हे गरजेच आहे आणि त्यासाठी प्लॅनिंग अतिशय गरजेच आहे.

इतर महत्वाच्या बातम्या