Continues below advertisement

3 Idiots Sequel Update: 2009 साली प्रदर्शित झालेला '3 इडियट्स' तुफान गाजला. 3 मित्रांची मैत्री अन् करिअरचा असणारा दबाव, याभोवती हा चित्रपट फिरतो. दरम्यान, प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी. लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. अलिकडेच अभिनेता शर्मन जोशी याने या चित्रपटाच्या सिक्वेलची आशा व्यक्त केली आहे. दरम्यान, त्याने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचं सांगितलं. जर '3 इडियट्स'चा सिक्वेल तयार झाला तर त्यात शर्मन जोशी असणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

'3 इडियट्स'मध्ये शर्मन जोशीने राजू रस्तोगीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात आमिर खानसह आर. माधवनचीही मुख्य भूमिका होती. दरम्यान, '3 इडियट्स' या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित होणार का? असा प्रश्न प्रेक्षकवर्गाकडून उपस्थित केला जात आहे. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना, शर्मनने चित्रपटाच्या पुढील भागावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत प्रेक्षकांना मोठी हिंट दिली आहे.

Continues below advertisement

शर्मन जोशी म्हणतो, "मला आशा आहे की, '3 इडियट्स' या चित्रपटाचा सिक्वेल तयार होईल. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मला '3 इडियट्स'च्या सिक्वेलच्या कथेबद्दल स्पष्ट कल्पना नाही. मला या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत कोणतीच माहिती नाही. जर चित्रपटात पोटेंशियल असेल तर, मास्टर राजू, अभिजात सर आणि आमिर खान या चित्रपटावर काम करेल", अशी माहिती शर्मन जोशी याने मुलाखतीतून दिली. त्यामुळे शर्मन जोशी याने दिलेल्या उत्तरामुळे तो या सिक्वेलचा भाग असणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

'3 इडियट्स 2'ची स्क्रिप्ट तयार

पिंकव्हिलामधील एका वृत्तानुसार, राजकुमार हिरानी यांनी '3 इडियट्स 2'ची स्क्रिप्ट फायनल झाली आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आमिर खान, करीना कपूर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी या मुख्य कलाकारांना पुन्हा एकत्र आणण्याची अपेक्षा आहे. राजकुमार हिरानी गेल्या अनेक वर्षांपासून या चित्रपटाच्या सिक्वेलचा विचार करत होते. मात्र, दादासाहेब फाळके बायोपिकला स्थगिती दिल्यानंतरच या चित्रपटाबाबत पुढील तयारी केली जाईल.

महत्त्वाच्य इतर बातम्या:

शरीरावर धारदार शस्त्राने वार; प्रसिद्ध अभिनेत्रीची क्रूर हत्या, बॉयफ्रेंडवर पोलिसांचा संशय

अनिल कपूर अन् रणबीरचं नातं काय? केवळ पडद्यावरच नाहीत, तर प्रत्यक्ष आयुष्यातही आहे 'लाडला'