Kolhapur District Assembly Constituency Election 2024 : कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या फेरीतील कल हाती आली आहेत. सर्वाधिक लक्ष लागून आलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या फेरीमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीमध्ये राजेश लाटकर यांना 7014 मते मिळाली असून राजेश क्षीरसागर यांना 4472 मते मिळाली आहेत. दरम्यान कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत असून पहिल्या फेरीमध्ये समरजितसिंहब घाटगे 1130 मतांनी आघाडीवरती आहेत. दरम्यान इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार राहुल आवाडे आघाडीवरती असून त्यांना 3990 मतांची आघाडी मिळाली आहे. प्रकाश आबिटकर 1022 मतांनी आघाडीवरती आहेत. शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा राजेंद्र पाटील यड्रावकर हे 3000 मतांनी आघाडीवरती आहेत. 



  • कोल्हापूर उत्तर मधून राजेश लाटकर आघाडीवर - अपक्ष

  • राधानगरी मधून प्रकाश अबिटकर आघाडीवर- शिवसेना शिंदे गट 

  • कागलमधून समरजित घाटगे-  आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

  • इचलकरंजी मधून राहुल आवाडे आघाडीवर - भाजप

  • कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक आघाडीवर- भाजप 

  • शिरोळ मधून राजेंद्र पाटील यड्रावकर - अपक्ष

  • शाहूवाडी विनय कोरे आघाडीवर - जन स्वराज्य पक्ष

  • चंदगडमधून शिवाजी पाटील आघाडीवर- अपक्ष 

  • करवीर मधून राहुल पाटील आघाडीवर- काँग्रेस

  • कोल्हापूर दक्षिण दुसऱ्या फेरीमध्ये भाजपचे अमल महाडिक 2550मतांनी आघाडीवर आहेत



सांगली ब्रेकिंग 


सांगलीत भाजपा सुधीर गाडगीळ पहिल्या फेरीत आघाडीवर 


2505 मतांनी सुधीर गाडगीळ आघाडीवर


भाजप सुधीर गाडगीळ यांना 7171


कॉंग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील 4666


अपक्ष जयश्री पाटील 4018



  • कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे समरजीतसिंह घाटगे 1130 मतांनी आघाडीवर

  • कोल्हापूर हातकणंगले.. पहिल्या फेरीत अशोकराव माने जनसुराज्याचे ५००५ मतांनी आघाडीवर

  • राधानगरी : २७२
    फेरी क्र १
    पक्ष/उमेदवार/मते:
    शिवसेना शिंदे : आमदार प्रकाश आबिटकर
    मते : ३९७६ (१६७६ ने आघाडी)
    शिवसेना ठाकरे : माजी आमदार के.पी. पाटील
    मतेः २३००
    अपक्ष : ए. वाय. पाटील
    मतेः १३३२


कोल्हापूर उत्तर मधून राजेश लाटकर आघाडीवर 


पहिल्या फेरीत महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना 4472 मते 


तर महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांना 7014 इतकी मते 


राजेश लाटकर 2542 मताने आघाडीवर 


कसबा बावडा येथील पहिली फेरी पडली पार


सांगली ब्रेकिंग 


तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघ - 


पहिली फेरी - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित आर आर पाटील 300 मतांनी आघाडीवर


इतर महत्वाच्या बातम्या