Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur District Assembly Constituency Election) सकाळी सात वाजल्यापासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासून रांगा लागल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक चुरस कागल, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण तसेच राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे. आज (20 नोव्हेंबर) सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या आकडेवारीमध्ये कागल आणि कोल्हापूर उत्तरमध्ये सर्वाधिक चुरस असल्याचे दिसून आलं आहे.
पहिल्या दोन तासांमध्ये कागल मध्ये 8.78 टक्के मतदानाची नोंद झाली आहे, तर कोल्हापूर उत्तर मध्ये 8.25 टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी मतदानाची नोंद हातकलंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये झाले असून तिथं 6.20 टक्के मतदान पहिल्या दोन तासांमध्ये झालं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरासरी 80 टक्क्यांच्या घरामध्ये मतदान होत असते. यावेळी हा आकडा गाठून पुढे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच दोन्ही आघाड्यांमधील कार्यकर्त्यांचा सुद्धा प्रयत्न आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु असून जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदानाची विधानसभा मतदार संघानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.
सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे
- चंदगड - 6.78 टक्के
- राधानगरी - 6.67 टक्के
- कागल – 8.78 टक्के
- कोल्हापूर दक्षिण – 7.25 टक्के
- करवीर – 7.76 टक्के
- कोल्हापूर उत्तर – 8.25 टक्के
- शाहूवाडी – 7.23 टक्के
- हातकणगंले – 6.20 टक्के
- इचलकरंजी – 7.47 टक्के
- शिरोळ – 7.53 टक्के
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल
दरम्यान, महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहण्याचे ठरवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला स्थिर सरकार हवं आहे, त्यामुळे गेल्यावेळी जसा घोडेबाजार झाला तसा घोडेबाजार यावेळी करता येणार नाही. विनोद तावडे यांच्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी सुप्रिया सुळे, नाना पटोले यांच्या ऑडिओ क्लिप दाखवण्यात येत असल्याचे देखील सतेज पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या