Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Election) च्या निवडणुकांना अवघे काही दिवसच उरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांचा कर्नाटकात जोरदार प्रचार सुरू झाला आहे. काँग्रेस पक्षही या प्रचारात निवडणुकांची जोरदार तयारी करत असल्याचं पहायला मिळत आहे.
कर्नाटकातील प्रचारासाठी गांधी बहिण-भाऊ(Rahul and Priyanka Gandhi) मैदानात उतरल्याचं पहायला मिळत आहे. राहुल गांधी आज (2 मे) रोजी कर्नाटकात दोन जाहीर सभा आणि रोड शो करणार आहेत. तसेच, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे चार कार्यक्रम असतील. ज्यात एक जाहीर सभा आणि तीन रोड शो समाविष्ट आहेत. सध्या राज्यातील सत्तेची सूत्रे भाजपकडे आहेत. दुसरीकडे ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी काँग्रेसने आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे.
राहुल गांधी यांचे कार्यक्रम
कर्नाटकात राहुल गांधी आज आपली संपूर्ण ताकद लावणार असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या प्रचाराची सुरुवात तीर्थहल्ली येथून सकाळी 11.30 वाजता झाली. इथे राहुल गांधी जनसंवाद देखील साधणार आहेत. यानंतर राहुल गांधी हासन मधील हरिहर येथे एक जनसंवाद करतील. त्यानंतर चिकमगलूर येथे दुपारी 03.15 वाजता राहुल गांधी एक रोड शो करतील.
प्रियांका गांधी यांचे कार्यक्रम
प्रियांका गांधी कर्नाटक प्रचारादरम्यान पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणार असल्यांचं चित्र पहायला मिळत आहे. त्यांचे चार लागोपाठ कार्यक्रम असतील. ज्याची सुरुवात मंड्या येथून दुपारी 12 वाजता झाली. प्रियांका गांधी इथे एका जाहीर सभेला देखील संबोधित करतील. यानंतर प्रियांका गांधी सलग तीन रोड शो करतील. ज्याची सुरुवात चिंतामणी येथे 04:00 वाजता होईल. त्यानंतर होस्कोटे संध्याकाळी 05:15 वाजता एक रोड शो होईल आणि सीव्ही रमण नगर येथे संध्याकाळी 07:15 वाजता एक रोड शो असेल.
कर्नाटकमध्ये भाजप, काँग्रेस आणि जेएस पक्षामध्ये तिरंगी लढत होणार आहे. कर्नाटक राज्यात 10 मे रोजी विधानसभेच्या 224 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणूकांचा निकाल 13मे रोजी लागणार आहे.