Kapil Sibal on Maharashtra Civic Polls: मनपा निवडणुकीमध्ये चांदा ते बांदा भाजप, शिंदे गट आणि मागून अजित पवार गटाची बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी स्पर्धाच लागली. मात्र ही स्पर्धा अघोरी पद्धतीचा असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. इतकेच नव्हे तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा धमकी देणारा व्हिडिओ सुद्धा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियामध्ये व्हायरल केला. यामध्ये ते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना थेट सुरक्षा काढून टाकण्यासाठी धमकी देत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडूनही उमेदवारांना धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. एकेका उमेदवारांनी दिलेला आकड पाहता डोळ्याचे बुबुळ बाहेर पडतील असेही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आता ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपिल सिब्बल यांनीही महाराष्ट्रातील बिनविरोध पायंड्यावर सडकून प्रहार केला आहे. त्यांनी ट्विट करत आपली निवडणूक व्यवस्था संकटात सापडत चालली असल्याचे म्हटलं आहे. 

Continues below advertisement

Continues below advertisement

पैशाची ताकद आणि राजकीय दबाव यावरच आता निवडणूक निकाल

कपिल सिब्बल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार महाराष्ट्रातील 69 पैकी 68 जागांवरती बिनविरोध निवडून आले आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे. आपली निवडणूक व्यवस्था संकटामध्ये सापडत झाली आहे. पैशाची ताकद आणि राजकीय दबाव यावरच आता निवडणूक निकाल ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत निवडणूक आयोगाला काहीच चिंता नाही का? अशी विचारणा त्यांनी केली आहे. 

बिनविरोध पायंड्यावर उद्धव ठाकरेंची टीका 

दरम्यान, बिनविरोध निवडणूक पायंड्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आज मुंबईसाठी वचननामा जारी करताना हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्या दमदाटीवरून राजीनाम्याची मागणी केली. बिनविरोध झालेल्या जागांवरही त्यांनी निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल करताना पश्चिम बंगालची आठवण करून दिली. राज्यकर्त्यांकडून आपण करत असलेल्या कृतीने चुकीचे पायंडे पाडत नाही आहोत ना, याचे भान सुटता कामा नये, असे म्हटले. 

इतर महत्वाच्या बातम्या