Kanhaiya Mittal Latest News चंदीगड: हरियाणा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपकडून उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये नाराजी वाढलेली आहे. भाजपमधील काही बड्या नेत्यांनी राजीनामे देखील दिले असल्याचं समोर आलं आहे. या दरम्यान प्रसिद्ध गायक कन्हैया मित्तल काँग्रेसच्या वाटेवर आहेत. भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यानं ते नाराज आहेत. 'जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे' हे त्यांचं गाणं उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत गाजलं होतं.
एबीपी न्यूज सोबत बोलताना कन्हैया मित्तल यांना उमेदवारी न मिळाल्यान नाराज आहात का असं विचारण्यात आलं. याबाबत बोलताना नाराजी नाही मात्र माझं मन काँग्रेस सोबत जोडलं जात असल्याचं म्हटलं. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षासोबत जोडलं जावं, असं मित्तल म्हणाले. विनेश फोगाट देखील काँग्रेसमध्ये गेली आहे, त्यानंतर तिला टिकेला सामोरं जावं लागत आहे. यामुळं मला वाटतं तिचं समर्थन करण्यासाठी पक्षाला पाठिंबा दिला पाहिजे. जर गोष्टी जुळून आल्या तर काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं कन्हैया मित्तल म्हणाले.
कन्हैय्या मित्तल यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला?
'जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे' हे तुमचं गाणं भाजपच्या प्रचारात खूप वाजलं होतं, असं विचारण्यातं आलं होतं. त्यानंतर काँग्रेसनं रामाला येण्यापासून रोखल्याचं म्हटलं होतं, आता इतका मोठा निर्णय कसा, असा प्रश्न देखील मित्तल यांना विचारण्यात आला. यावर बोलताना मित्तल म्हणाले की, मी असं बोललो नाही, मी असं म्हटलेलं जर पंतप्रधान असताना मनमोहन सिंह यांनी राम मंदिराचा निर्णय घेतला असता तर त्यांच्यासाठी देखील गाणं म्हटलं असतं. मात्र, आता देशातील लोकांना वाटत आहे की काँग्रेस सोबत गेलं पाहिजे. नव्या तरुणाईला समजून गेतलं पाहिजे. आम्ही रामाला मानतो हे ठीक आहे. मात्र, रामाचे सर्व विरोधक काँग्रेसमध्ये आहेत असं नाही. तिथं पण रामाला मानणारे आणि सनातनी लोक आहेत, सर्वांनी एकत्र येऊन काम करावं, असं कन्हैया मित्तल म्हणाले.
इतर बातम्या :