BJP Mission 2024 : एकीकडे भाजप आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिशन महाराष्ट्र राबवत असताना. ज्या मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार विजयी झालेले नाहीत अशा ठिकाणी भाजप ताकद वाढवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. यामध्ये शत प्रतिशद भारत मिशनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवसीय दौरा करत आहेत. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी भाजपाच्या या मिशनचा शिंदे गट समर्थन करणार का ? कसा असणार भाजपचा शतप्रतिशत भाजप मिशन कार्यक्रम पाहूयात...
मिशन मुंबई गृहमंत्री अमित शहांचा दौरा. मिशन महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा आणि आता मिशन शत प्रतिशत भाजपमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघातला होणारा दौरा. चांगलेच चर्चेची विषय बनताय. ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत त्याच मतदारसंघात एक नाही दोन नाही तर तब्बल पाच वेळेस केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे पुढील पंधरा महिन्यात दौरे करणार आहेत. तळागाळात भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे
भाजपाचे या दौऱ्यामागचे नियोजन नेमके काय आहे ? ते समजून घेऊ
ज्या लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार नाही त्या मतदारसंघात भाजप संघटनात्मक बांधणी आणि ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
देशातील 144 आणि महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघ हे भाजप आणि शत प्रतिशत भाजप या मिशनसाठी निवडले आहेत.
महाराष्ट्रातील कल्याण पालघर बारामती यासारख्या लोकसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे.
या 16 लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांची पालक म्हणून नेमणूक करून या मतदारसंघात भाजपची ताकद वाढण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.
या दौऱ्यादरम्यान तळागाळातील भाजप कार्यकर्ते आमदार पदाधिकारी यांच्याशी थेट संवाद हे केंद्रीय मंत्री दौऱ्यादरम्यान साधणार आहेत.
मात्र जे लोकसभा मतदारसंघ निवडले आहेत त्यात कल्याण ध्ये जेव्हा अनुराग ठाकूर यांचा दौरा होतोय, तेव्हा कल्याण नेमकं कोणाचं ? असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. प्रत्येक पक्षाला ताकद वाढवण्याचा अधिकार आहे मात्र पक्षाची ताकद वाढवत असताना या मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार सुद्धा देणार का ?भाजपसोबत शिंदे गट सत्तेत आहे, असं असताना शिंदे गटाच्या खासदाराच्या आणि खास करून मुख्यमंत्र्यांच्या पुत्राच्या मतदारसंघात जेव्हा भाजप अशा प्रकारचे दौऱ्यांचे नियोजन करून ताकद वाढवतोय तेव्हा या मिशन चे शिंदे गट समर्थन करतोय का ?
पक्षाची ताकद वाढवण्याचा संघटनात्मक बांधणी करण्याचा अधिकार हा प्रत्येक पक्षाला आहे. मात्र ही ताकद वाढवण्याचा प्रयत्न जेव्हा आपल्याच मित्र पक्षाच्या मतदारसंघात केला जातोय, तेव्हा अनेक प्रश्न समोर येतात आणि मग त्याची चर्चा होते. त्यामुळे पक्षाची ताकद जरी वाढवण्याचा प्रयत्न भाजपा शिंदे गटांकडून केला जात असला तरी उमेदवार देत असताना सामंजस्याने प्रश्न सोडवले जातील हीच अपेक्षा राज्यातील दोन्ही गटातील नेते सध्या तरी करत असल्याचं चित्र आहे.