KDMC Election 2022 : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यंदा पहिल्यांदाच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका पॅनल पद्धतीने पार पडणार आहे. तीन पैकी एक प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहिली. याच्या परिणामी अनेक मातब्बरांच्या जागा सुरक्षित राहिल्या. आज जाहीर झालेल्या सोडतीत अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांसाठीचे आरक्षण जाहीर झाले.  


 कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक दोन वर्षापासून प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाने वेग पकडला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 44 वॉर्डमधून 133 जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. यातील 58 जागा सर्वसाधारण महिलांसाठी, 7 जागा अनुसूचित जाती तर 2 जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर  6 जागा अनुसूचित जातींसाठी, तर 2 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असून 58 जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. पालिकेच्या निवडणुका प्रथमच पॅनल पद्धतीने होणार असल्याने आज होणाऱ्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 


आज सोडतीत प्रत्येक प्रभागातील एक जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्याने नव्या पॅनल पद्धतीत समाविष्ट झालेल्या दिग्गज नगरसेवकाचे प्रभाग सुरक्षित झाले आहेत. या दिग्गजांना उर्वरित दोन जागेवरील उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आपल्या बरोबरच आपल्या पत्नी आणि मुलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी काहींनी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.  इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्ष्श्रेष्ठी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहेत.


कल्याण-डोबिंवली महापालिकेची लोकसंख्या किती?


> एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार ,762


> अनुसूचित जाती : 1 लाख 50 हजार 171


> अनुसूचित जमाती : 42 हजार 584


 


>> महापालिकेतील जागा


एकूण सदस्य : 133  महिला : 67


अनुसूचित जाती : 13 ,महिला : 07


अनुसूचित जमाती : 04 ,महिला : 02


सर्वसाधारण 116, महिला 58



3 सदस्यांचे 43 प्रभाग सरासरी लोकसंख्या 34,258


4 सदस्यांचा 1 प्रभाग सरासरी लोकसंख्या 45 हजार 677



>> कोणत्या प्रवर्गासाठी कोणत्या जागा आरक्षित


> अनुसूचित जाती प्रवर्गासाठी – 2 अ ,15 अ, 19 अ, 22 अ, 25 अ, 44 अ


> अनुसूचित जाती (महिला) -  4 अ, 6 अ, 7 अ, 17 अ, 20 अ, 23 अ, 43 अ


> अनुसूचित जमाती पुरुष प्रवर्ग -  5 अ, 21 अ


> अनुसूचित जमाती महिला-  6 ब, 19 ब


>> सर्वसाधारण महिला - 1अ, 2ब, 3अ-ब, 4 ब, 5 ब, 7ब, 8ब, 9अ, 10अ-ब, 11 अ-ब, 12अ, 13 अ-ब, 14 अ-ब, 15 ब, 16 अ, 17 ब, 18 अ, 20 ब, 21 ब, 22 ब, 23 ब, 24 अ-ब, 25 ब, 26 अ, 27 अ-ब, 28 अ-ब, 29 अ, 30 अ-ब, 31अ, 32 अ-ब, 33 अ, 34 अ-ब, 35 अ-ब, 36 अ-ब, 37 अ, 38 अ, 39 अ, 40 अ, 41 अ-ब, 42 अ, 43 ब, 44 ब-ड