रांची : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidan Sabha Election 2024) धूम आहे. सगळीकडेज जागावाटप आणि उमेदवारी याचीच चर्चा आहे. नेतेमंडळी तिकीट मिळावं म्हणून जीवाचं रान करत आहेत. तर काही नेते तिकीट मिळालं म्हणून मोठा जल्लोष करत आहेत. महाराष्ट्रासोबत झारखंड राज्यातही विधानसभेची निवडणूक होत आहे. या राज्यातही महाराष्ट्रासारखीच परिस्थिती आहे. येथे अनेक पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. दरम्यान, सध्या झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान असलेल्या हेमंत सोरन (Hemant Soren) यांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या पहिल्या यादीनुसार सोरेन यांचं अख्खं कुटुंबच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं दिसतंय. 


भाऊ, पत्नीला तिकीट


झारखंड विधानसभेसाठी सोरने यांनी झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 35 जागांचा समावेश आहे. सोईच्या जागांवर सध्या झारखंड मुक्ती मोर्चाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, या यादीत मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पत्नी कल्पना सोरने तसेच भाऊ बसंत सोरेन यांची नावे आहेत. 


एकूण 40 जागांवर उमेदवार देणार


हेमंत सोरेन यांचा पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहे. येथे काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. या युतीनुसार झारखंड मुक्ती मोर्चा एकूण 40 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आता फक्त पाच जागांवर उमेदवार घोषित करणे बाकी आहे. 
भाऊ, बायकोला कोणत्या मतदारसंघातून तिकीट


नेमकी कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी


झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीत ते बहरेट या जागेवरून निवडणूक लढवतील. त्यानंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांना गांण्डेय मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तर त्यांचे बंधू  बसंत सोरेन यांनादेखील झारखंड मुक्ती मोर्चाने तिकीट दिले आहे. ते दुमका या मतदारसंघातून निवडणूक लढवतील. 


झारखंडचा निवडणूक कार्यक्रम


दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावली आहे. तर सत्ताधारी सोरेन सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर या दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजमी होईल.  


हेही वाचा :


Hyundai चा प्लांट महाराष्ट्राच्या विकासाला मोठी गती देईल, देवेंद्र फडवीसांनी मानले पंतप्रधानांचे आभार 


Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वरळीपासून शिवडी, धारावी, गुहागरपर्यंत...; महायुतीमध्ये 18 जागांवर पेच कायम, तिघांकडून वेट ॲंड वॉचची भूमिका


Eknath Shinde Candidate List : गुवाहाटीला गेलेल्या सगळ्या सहकाऱ्यांना तिकीट, एकनाथ शिंदेंच्या पहिल्या यादीत कोण कोण?