रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी आलेल्या राहुल गांधी (Rahul gandhi ) यांना काही वेळ थांबावं लागलं. राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर थांबवण्यात आलं होतं. क्लिअरन्स न मिळाल्यानं राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर महागामा येथे थांबवण्यात आलं. राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर जवळपास पाऊण तास थांबवण्यात आलं होतं, असा आरोप काँग्रेसनं केला आहे. पीएम नरेंद्र मोदी आज झारखंडमध्ये प्रचार करण्यासाठी पोहोचले आहेत. चकाई येथे त्यांची प्रचारसभा आहे. यामुळं राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी नाकारण्यात आली.   


राहुल गांधी यांनी झारखंडमध्ये काय म्हटलं?


झारखंडच्या गोड्डा मधील मेहरमा येथे राहुल गांधी यांनी प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदींवर टीका केली. नरेंद्र मोदी अब्जाधीश यांची कठपतुळी आहते. अब्जाधीश जे म्हणतील ते नरेंद्र मोदी करतात, असं राहुल गांधी म्हणाले. मोदींनी गरिबांकडून पैसे काढून घेत अब्जाधीशाचं 16 लाख कोटींचं कर्ज माफ केलं आहे. महाराष्ट्रातील मविआचं सरकार जमीन हडवण्यासाठी पाडण्यात आलं, असं त्यांनी म्हटलं.  


राहुल गांधी म्हणाले आम्ही विचारधारेची लढाई लढली आहे. काँग्रेस आणि  INDIA  आघाडीचे लोक संविधान वाचवण्याचं काम करत आहेत. दुसरीकडे भाजप आरएसएस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहेत,असा आरोप राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी म्हणतात राहुल गांधी लाल पुस्तक दाखवतात, त्यांना सांगणं आहे, पुस्तकाच्या रंगाचा विचार करु नका, पुस्ताक जे लिहिलं आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्ही जर संविधान वाचलं असतं तर लोकांमध्ये त्यांनी द्वेष पसरवला नसता, एकमेकांमध्ये लढायला लावलं नसतं, असं राहुल गांधी म्हणाले. आपलं संविधान भारताचा आत्मा आहे. देशाचा इतिहास आहे, दलितांचा सन्मान, मागासवर्गीयांची भागिदारी, शेतकरी आणि मजुरांचं स्वप्न आहे. मात्र भाजप-आरएसएसच्या लोकांना ते संपवायचं आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 




झारखंडसाठी  INDIA आघाडीच्या 7 गॅरंटी   


INDIA आघाडीनं झारखंड विधानसभेसाठी सात गॅरंटी जाहीर केल्या आहेत. सरना धर्म कोडला मान्यता, महिलांना दरमहा 2500 रुपये, एसटी-एससी आणि ओबीसींचं आरक्षण 28 टक्के, 12 टक्के आणि 27 टक्के करण्यात येणार, अशी गॅरंटी देण्यात आली आहे. महिलांना 450 रुपयांना गॅस सिलिंडर, प्रत्येक व्यक्तीला 7 किलो रेशन, 10 लाख नोकऱ्या, 15 लाखांपर्यंत आरोग्य विमा, शेतकऱ्यांना धानाला 3200 रुपये हमीबाव, इतर  पिकांच्या हमीभावात 50 टक्के वाढ, अशा गॅरंटी देण्यात आल्या आहेत.  


इतर बातम्या :