नागपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मतदारसंघात त्यांच्याकडून प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रात भाजप, शिवेसना महायुतीचं सरकार येईल. प्रचंड बहुमतानं सरकार येईल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी काही म्हटलं असलं तरी केंद्राचे नेते निर्णय करतील, असं ते म्हणाले.
लाडक्या बहिणी आम्हाला मतदान करतील : चंद्रशेखर बावनकुळे
आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला मतदान करतील, असं बावनकुळे म्हणाले. आमचे 45 लाख शेतकरी आहेत ज्यांचं वीज बील माफ केलं आहे. त्यांना पुढील पाच वर्ष बील येणार नाही, असं सांगितलं आहे. घरगुती वीज बिलात 30 टक्क्यांची कपात असेल. पंतप्रधान सूर्यघर योजना येणार नाही. मुलींना मोफत शिक्षण देणार आहे. केजी ते पीजीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण असणार आहे. आम्ही 58 योजना घेऊन आलो आहोत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.ते पुढं म्हणाले, महिलांनी ठरवलं आहे सख्खे लाडके भाऊ हे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे आहेत. सावत्रभाऊ काँग्रेसवाले आहेत, त्यामुळं त्यांनी आम्हाला मतदान करायचं ठरवलं आहे, असंही बावनकुळेंनी म्हटलं.
केंद्र राज्य मिळून काम करेल
शेतकरी भावांना पुढील पाच वर्ष वीज बील येणार नाही. सहा कोटी 50 लाख लोकांना मोफत रेशन देणार आहे. मुलींना मोफत शिकवणार आहोत. आमच्या मागं मोदी सरकार आहे. मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार म्हणून राज्याला देशातील विकसित राज्य करु, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.लाडक्या बहिणी, शेतकरी, शेतमजूर, सामाजिक न्याय, आदिवासी विभागाच्या योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्राची जनता महायुतीला मतदान करेल. केंद्र सरकार राज्य सरकार मिळून लोकांना मजबूत करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी काही म्हटलं तरी केंद्राचे नेते निर्णय करतील
देवेंद्र फडणवीस यांनी काही म्हटलं असलं तरी केंद्राचे नेते निर्णय करतील, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. आमचे तीनही नेते बसून निर्णय करतील. आम्ही मुख्यमंत्री पदाकरता लढत नाही. 14 कोटी जनतेच्या हितासाठी लढतोय.महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत. सरकार हे साधन आहे त्यातून शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करु शकतो, असं बावनकुळे म्हणाले. देवेंद्र फडणवीस काही म्हटले तरी ती बाब त्यांच्या अधिकारात नाही. आमच्या राज्याचे तीन नेते बसतील तेव्हा आणि मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होईल, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मी राज्याचा मुख्यमंत्री व्हावे, अशी भाजप पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण आता मुख्यमंत्री होणे हे सर्व माझ्यासाठी गौण आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची कोणतीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही,असं देवेंद्र फडणवीस यांनी एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
इतर बातम्या :