Sangli District Nagar Palika Election: सांगली जिल्ह्यामध्ये अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपला बालेकिल्ला राखताना उरण ईश्वरपूर नगरपरिषदेमध्ये एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिला आहे. जयंत पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, या निवडणुकीत जयंत पाटील यांनी नगराध्यक्ष पदासह 23 जागा जिंकत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे. भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट तसेच काँग्रेसच्या विकास आघाडीच्या पदरात केवळ 8 जागा मिळाल्या. दुसरीकडे, आष्टा नगर परिषदेमध्येही शरद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सत्ता मिळवली आहे. पलूस नगरपरिषदेत काँग्रेसने विजय मिळवला आहे. 

Continues below advertisement

शिराळ्यात शिवसेनेचा मोठा विजय

शिराळा नगरपंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट महायुतीला 11 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या. महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक 273 मतांनी विजयी झाले. 

पलूसमध्ये काँग्रेसचा विजय 

पलूसमध्ये चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसने नगररिषदेतील सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. भाजपला याठिकाणी केवळ एका जागेवर विजय मिळविता आला. राष्ट्रवादी अजित पवार गटाला चार जागा मिळाल्या. पलूस नगरपरिषदेत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचे वर्चस्व राहिले. 

Continues below advertisement

जत आणि आटपाडीत भाजपचा विजय 

जतमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी आटपाडी नगरपंचायतीवर एकहाती सत्ता आणली आहे.  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या साथीत आटपाडी नगरपंचायतीवर यु. टी. जाधव यांनी विजय मिळवला. 

तासगाव नगर परिषदेत संजय काकांच्या आघाडीचा विजय 

सांगली जिल्ह्यातील तासगाव नगर परिषदेत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजया बाबासो पाटील विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपा राष्ट्रवादी अजितदादा गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. या नगरपालिकेमध्ये एकूण 24 जागांसाठी आज मतमोजणी झाली यामध्ये माझी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे 13 तर आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत.

सांगली जिल्हा नगराध्यक्ष

  • एकूण जागा : 8 (6 नगरपरिषद 2 नगरपंचायत) 
  • शरद पवार राष्ट्रवादी : 2  उरूण ईश्वरपूर  नगरपरिषद, आष्टा नगरपरिषद (आष्टा शहर विकास आघाडी)
  • शिवसेना शिंदे : 2 विटा नगरपरिषद, शिराळा नगरपंचायत
  • भाजप :  2 आटपाडी नगरपंचायत,  जत नगरपरिषद, 
  • काँग्रेस : 1 पलूस नगरपरिषद
  • माजी खासदार संजय काका पाटील यांची स्वाभिमान विकासा आघाडी: 1  तासगाव नगरपरिषद
  • शिवसेना ठाकरे गट- 0
  • अजित पवार राष्ट्रवादी - 0
  • मनसे - 0

इतर महत्वाच्या बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची जोरदार मुसंडी; भाजपची काय स्थिती?