Kolhapur Municipal Council Elections: कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका तीन नगरपंचायतींसाठी मतमोजणी सुरू आहे. चंदगडमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झाल्यानंतर आता कागल तालुक्यामध्ये सुद्धा धक्कादायक विजयाची नोंद झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने मुरगुड नगरपालिकेवरती झेंडा फडकवला आहे. शिवसेना शिंदे गटाचे या ठिकाणी 16 नगरसेवक विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपदी सुद्धा सुहासिनी देवी प्रवीण सिंह पाटील यांनी विजय खेचून आणला आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चार जागांवर विजय मिळाला आहे. 

Continues below advertisement

कागल निवडणूक गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत आहे. कागल तालुक्यांमध्ये मुश्रीफ आणि घाटगे गट एकत्रित आल्याने राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे कागल नगरपरिषद तसेच मुरगूड नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मुश्रीफ आणि घाटगे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, आता मुरगुडेमध्ये त्यांना धक्का बसल्याचे चित्र आहे. दोन्ही गट एकत्र आल्याने शिवसेना शिंदे गट एकाकी पडल्याचे चित्र होते. त्यामुळे माजी खासदार संजय मंडलिक यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली होती.  प्रवीणसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या पत्नी सुहासिनी देवी यांना संजय मंडलिक गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलं होतं. मात्र, आता आपण मुश्रीफ-घाटगे गटाला धक्का देत संजय मंडलिक यांनी मुरगुडमध्ये विजय खेचून आणल्याचे चित्र आहे. 

पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक

विजयी उमेदवारीजयश्री प्रकाश पवार जनसुराज्य नगराध्यक्ष विजयी20 पैकी सहा बिनविरोध14 पैकी चार अपक्ष विजयी16 ठिकाणी जनसुराज्य, भाजपा, स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी.

Continues below advertisement

हातकणंगले नगरपंचायत

हातकणंगले नगरपंचायत नगराध्यक्ष पदी  शिवसेनेचे अजितसिंह पाटील विजयशिंदे गट 6काँग्रेस 5शिवसेना ठाकरे 1भाजप 2अपक्ष 3

मलकापुरात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या रश्मी कोठावळे 485 मतानी नगराध्यक्षपदी विजयी

इतर महत्वाच्या बातम्या