मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मो रक्षति रक्षित या मनुस्मृतीतील वाक्याचे डिझाईन आपल्या सोशल मीडिया हँडलवरून प्रसारित केले आहे. त्यावर महाराष्ट्र धर्म असे कॅप्शन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावरून फडणवीस यांना महाराष्ट्रातील प्रश्न मांडत टोला लगावला आहे. शिवाय, हे महाराष्ट्र धर्माचे रक्षण कसे करणार ? असासवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. 




जयंत पाटील काय काय म्हणाले?


महाराष्ट्र धर्माची भाजपाची व्याख्या म्हणजे महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला घालवणे आणि राज्याची आर्थिक लूट करणे. विचारसरणीशी गद्दारी करण्यास प्रोत्साहन देणे. राज्यात बेरोजगारी वाढवून गुन्हेगारीला प्रोत्साहन देणे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळू न देणे.  सर्वात महत्त्वाचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा पैसे खाणे आणि महाराजांच्या कर्तृत्वाचे श्रेय इतरांना देणे. हे महाराष्ट्र धर्माचे रक्षण कसे करणार ?




उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य जाहीर सभा घेतली. फडणवीस यांनी जनतेसमोर महायुती सरकारच्या काळात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार प्रस्थापित करण्यासाठी मतदारांना आवाहन केले.


शिवसेनेच्या भावना गवळी (रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ), भाजपचे श्याम खोडे (वाशीम) आणि सई डहाके (कारंजा) या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याची विनंती जनतेला केली. ते म्हणाले की, महायुती सरकारने राज्यात शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, आणि युवकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या आहेत. पुढे सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी दिली जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली.


दरम्यान, वाशीम शहरातील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे भाजपच्या ताफ्यात आणखी एक अनुभवी नेता सामील झाला आहे, ज्याचा लाभ पक्षाला या निवडणुकीत मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी घेतली विनोद पाटलांची भेट, मराठा आरक्षणावरून तापलेल्या मराठवाड्यातील भाजपचं चित्र बदलणार?